Hrithik Roshan : काय सांगता? डॉक्टरांनी हृतिक रोशनला डान्स करण्यास केली होती मनाई, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:49 IST2023-03-28T13:39:00+5:302023-03-28T13:49:32+5:30
Hrithik Roshan : हृतिकचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ सुपरहिट ठरला आणि हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या डान्सने तर तरूणाईला वेड लावलं...

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. फक्त भारतातच नाही तर विदेशातही हृतिकचे चाहते आहे. त्याचा लुक आणि डान्सचे तर अनेकजण अक्षरशः दिवाने आहेत.
हृतिकचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ सुपरहिट ठरला होता आणि हृतिक रातोरात स्टार झाला. त्याच्या डान्सने तर तरूणाईला वेड लावलं.
पण याच हृतिकला डॉक्टरांनी डान्स करण्यास मनाई केली होती. होय, एकेकाळी हृतिकला डान्स करण्यास मनाई होती. खुद्द हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी हा खुलासा केला.
राकेश रोशन अलीकडे 'इंडियन आयडॉल 13' या समध्ये स्पेशल गेस्ट म्हणून हजर झाले होते. यावेळी त्यांनी केवळ स्वतःबद्दलच नाही तर त्यांच्या लेकाबद्दलही काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
डॉक्टरांनी हृतिकला बॉडी बनवण्यास आणि डान्स करण्यास स्पष्टपणे मनाई केली होती. मात्र हृतिकने डॉक्टरांच्या सर्व गोष्टी खोट्या ठरवत आपल्या चिकाटीने सगळं काही मिळवलं, असं राकेश रोशन यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, 'कहो ना प्यार है' साठी आम्ही एका नव्या मुलाच्या शोधात होता. हृतिक मोठा होत होता. मग आम्ही त्यालाच या सिनेमात घ्यायचं ठरवलं. त्यावेळी तो एकदम फाेकस्ड होता, पण एक अडचणही होती....
पुढे त्यांनी सांगितलं, तुला डान्स करायचा नाहीये, तू बॉडी पण बनवू शकत नाही, कारण तुला स्पाइनल कोअरमध्ये काही प्रॉब्लेम आहे, असं डॉक्टरांनी हृतिकला सांगितलं होतं...
ते म्हणाले, हृतिकने मात्र डॉक्टरांनाच खोटं ठरवलं. त्याने जणू आव्हान स्वीकारत सगळ्या गोष्टींवर विजय मिळवला. त्याने बुक्ससोबत आणि नंतर डंबेलसह व्यायाम करण्यास सुरुवात केली.
राकेश रोशन यांनी केलेला हा खुलासा ऐकून शोमधील प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. कारण आजही डान्सच्या बाबतीत हृतिकला टक्कर देऊ शकणारे फार कमी लोक इंडस्ट्रीत आहेत.