R. Madhavan ते salman khan! बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:00 PM2022-02-11T12:00:00+5:302022-02-11T12:00:00+5:30

Bollywood celebs: आज आपण अशा १० कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. जे खासकरुन ऑर्गेनिक शेतीमुळे चर्चेत येत आहेत.

बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या पर्सनल लाइफमुळे. परंतु, आज आपण अशा १० कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. जे खासकरुन ऑर्गेनिक शेतीमुळे चर्चेत येत आहेत. हो. बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे घरच्या घरी शेती करतात. हे कलाकार कोणते ते पाहुयात.

सलमान खान- बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या फार्महाऊसविषयी सगळ्यांनाच माहित आहे. सलमानने या फार्महाऊसवर वेगवेगळ्या धान्य, भाज्यांची लागवड केली आहे. मध्यंतरी त्याने शेतात टॅक्टर चालवतांनाचा फोटोही शेअर केला होता.

शिल्पा शेट्टी - बॉलिवूडची योगागर्ल शिल्पा शेट्टीनेदेखील तिच्या घराशेजारी लहानसं गार्डन केलं आहे. या गार्डनमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड करत असते.

धर्मेंद्र बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) हे सध्या त्यांचा सगळा वेळ शेतीमध्ये घालवतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेकदा ते सोशल मीडियावर त्यांच्या शेतकामाचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.

दिया मिर्झा - दिया मिर्झाने तिच्या घराशेजारीच लहानशी शेती करते. ती तिच्या गार्डनमध्ये अनेक भाज्यांची लागवड करत असते.

जॅकी श्रॉफ - जॅकी श्रॉफ कायमच लोकांना ऑर्गेनिक शेती करण्याविषयी जागृत करत असतात. जॅकी श्रॉफने मुंबई-पुणे दरम्यान ४४ हजार वर्ग फूट जागेमध्ये एक फार्महाऊस उभारलं आहे. येथे ते शेती करतात.

आर. माधवन - दाक्षिणात्य कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या आर. माधवनचीही शेती आहे. या शेतीमध्ये तो जुन्या पद्धतीसह नव्या पद्धतीने पिक उगवायचा प्रयत्न करत असतो. माधवनने त्याच्या शेतात मोठ मोठी नारळाची झाडंही लावली आहेत.

राजेश कुमार - साराभाई वर्सेस साराभाईफेम रोसेश साराभाई म्हणजेच राजेश कुमार हेदेखील ऑर्गेनिक शेती करतात.

प्रकाश राज - प्रकाश राज यांच्या शेतीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. सोशल मीडियावर ते कायम त्यांच्या शेतातील फोटो शेअर करत असतात.

जुही चावला - जुही चावलादेखील सध्या शेतीक्षेत्रात नशीब आजमावत आहे. तिने तिच्या फार्म हाऊसमध्ये अनेक पिकांची लागवड केली आहे.

प्रिती झिंटा - बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटादेखील शेती करत असून अनेकदा याचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रितीने तिच्या शेतात सिमला मिर्ची, टोमॅटो,केळी, स्ट्रॉबेरी, संत्री, पीच, पेरी अशा फळझाडांची लागवड केली आहे.