"मला तिचे अंडरगार्मेंट्स..." दिग्दर्शकाच्या विचित्र मागणीनंतर प्रियांकाने सोडला होता सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:07 AM2023-05-24T11:07:05+5:302023-05-24T16:41:14+5:30

प्रियांकाने एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) आज जगभरात नाव कमावलं आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. सध्या ती तिच्या हॉलिवूड प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते. 'सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन' या नुकत्याच रिलीज झालेल्या हॉलिवूड सिनेमात ती लीड रोलमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वीच 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने बॉलिवूडची पोलखोल केली होती. तिला कशाप्रकारे कॉर्नर करण्यात येत होते याचा खुलासा तिने केला. बॉलिवूडमधील गटबाजी, पॉलिटिक्सला कंटाळून ती हॉलिवूडच्या मार्गाला लागली.

प्रियांका चोप्राने एका प्रसिद्ध मासिकाला दिलेली मुलाखत आता चर्चेत आहे. यामध्ये एका दिग्दर्शकाने केलेल्या कमेंटचा तिने खुलासा केला आहे. कास्टिंग काऊचचा सारखाच हा प्रकार आहे. प्रियांका चोप्राही अशा प्रकारच्या वागणूकीला बळी पडली आहे.

प्रियांकाने मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला. ती म्हणाली, "जेव्हा मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत नवीन होते एका दिग्दर्शकाच्या वागण्यामुळे खूप अनकंफर्टेबल झाले होते. त्याने मला इतकी असहज वागणूक दिली की मी सिनेमाच सोडला होता."

ती म्हणाली, "2002-03 ची गोष्ट आहे. एका चित्रपटात मी अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारत होते. तेव्हा मी एका मुलाला सिड्युस करणार असा तो सीन होता. त्यात मला माझे काही कपडेही काढावे लागणार होते. हा सीन करताना मी चादर ओढावी अशी माझी इच्छा होती. मात्र तेव्हा तो दिग्दर्शक म्हणाला नाही मला तिचे अंतर्वस्त्र पाहायचे आहे. नाहीतर ही फिल्म कोण बघणार?"

ती पुढे म्हणाली, "हे त्याने मला नाही तर माझ्या स्टायलिस्टला सांगितलं. दिग्दर्शकाचं ते बोलणं मला इतकं अपमानजनक वाटलं की माझा कशाप्रकारे वापर केला जातोय. माझ्या टॅलेंटचा तर काही आदरच होत नाहीए. दोन दिवसांनंतर मी तो सिनेमा सोडला. कारण मी रोज त्या दिग्दर्शकाला नजरेसमोर बघूच शकत नव्हते."

प्रियांका आता हॉलिवूडमध्ये स्थिरावली आहे. निक जोनाससोबत तिचा संसार सुरु आहे. दोघांना मालती मेरी ही गोंडस मुलगी देखील आहे. याशिवाय प्रियांका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच आलिया भट आणि कतरिना कैफसह प्रियांका चोप्रा या तिघी आघाडीच्या अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत. चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता आहे.