महेश बाबूची मेहुणी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; बॉलिवूडमध्ये काम करतीये नम्रताची सख्खी बहीण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:55 PM2023-05-04T19:55:37+5:302023-05-04T20:06:16+5:30

Shilpa shirodkar:सोशल मीडियावर महेश आणि नम्रताची कायम चर्चा होत असते. मात्र, यावेळी नम्रताच्या सख्ख्या बहिणीची चर्चा रंगली आहे.

दमदार अभिनयशैली आणि स्मार्टनेस यांच्या जोरावर लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे महेश बाबू.

दाक्षिणात्य कलाविश्वात महेश बाबूचं मोठं नाव आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

महेश बाबूच्या प्रोफेशनल लाइफसोबत त्याच्या पर्सनल आयुष्याचीही कायम चर्चा रंगते.

महेशने मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिच्यासोबत लग्न केलं आहे.

सोशल मीडियावर महेश आणि नम्रताची कायम चर्चा होत असते. मात्र, यावेळी नम्रताच्या सख्ख्या बहिणीची चर्चा रंगली आहे.

नम्रताची सख्खी बहिणीदेखील अभिनेत्री आहे.

नम्रताच्या बहिणीचं नाव शिल्पा शिरोडकर असं असून ती हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे.

शिल्पाने अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

शिल्पाने काही बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.

शिल्पाही सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसह ती पर्सनल आयुष्यातील घडामोडी, किस्सेही चाहत्यांसोबत शेअर करत असते.