बॉयफ्रेंडसाठी अभिनेत्रीने सोडलं बॉलिवूड; दारुच्या व्यसनामुळे उद्धवस्त झालं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 09:44 AM2023-08-06T09:44:11+5:302023-08-06T09:55:13+5:30

Bollywodd actress: तिने ९० च्या दशकात डॅडी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, २१ व्या शतकातच तिच्या करिअरला उतरती कळा लागली.

बॉलिवूडच्या इतिहासामध्ये ९० च्या काळाला विशेष महत्त्व आहे. या काळातील अनेक सिनेमा ,कलाकार तुफान गाजले. विशेष म्हणजे आजही तो काळ इंडस्ट्रीसाठी खास आहे.

९० च्या काळात सलमान, शाहरुख, संजय दत्तसह माधुरी दिक्षित, ममता कुलकर्णी, करिश्मा कपूर,पूजा भट्ट आणि सोनाली बेंद्रे अशा कितीतरी कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

परंतु, हा काळ गाजवलेले कितीतरी कलाकार आज इंडस्ट्रीमधून गायब आहेत. तर, काहींचा कालाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट.

पूजाने मॉ़डेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. हळूहळू करत तिने सिनेसृष्टीत तिचं नाव कमावलं. परंतु, कालांतराने यशाच्या शिखरावर असताना तिने अचानकपणे इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला.

पूजाने इंडस्ट्री सोडल्यानंतर ती दारुच्या आहारी गेली. परिणामी, तिच्या करिअरवरही त्याचा गंभीर परिणाम झाला. बऱ्याचदा तिने तिच्या दारुच्या व्यसनावर भाष्य केलं आहे.

पूजाने ९० च्या दशकात डॅडी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, २१ व्या शतकातच तिच्या करिअरला उतरती कळा लागली.

पूजाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करता यावं यासाठी करिअरमधून काढता पाय घेतला. पूजाने प्रियकर व्हिडीओ जॉकी मनीष मखीजा याच्याशी २००३ मध्ये लग्न केलं.

लग्नानंतर १४ वर्षांनी पूजा आणि मनीष यांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पूजा दारुच्या आहारी गेली.

घटस्फोटानंतर पूजाला दारुचं प्रचंड व्यसन लागलं होतं. परंतु, त्यावर तिने मात केली. वयाच्या ४४ व्या वर्षी तिने दारुचं व्यसन पूर्णपणे सोडवलं.

दारुच्या आहारी गेल्यामुळे त्याचा परिणाम पूजाच्या करिअरवर झाला होता. परंतु, हे व्यसन सुटल्यानंतर तिने २०२० मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं.

२०२० मध्ये पूजाने 'सडक 2' या सिनेमातून कलाविश्वात पुन्हा पदार्पण केलं. त्यानंतर ती बॉम्बे 'बेगम', 'चूप: द रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमात झळकली.

सध्या पूजा बिग बॉस ओटीटी २ मध्ये झळकत आहे.