अजय देवगणसोबत केलेली बॉलिवूड एन्ट्री, आज त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:36 IST2025-01-30T17:18:31+5:302025-01-30T17:36:22+5:30

या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने अजय देवगणसोबत बॉलिवूड पदार्पण केलं होतं. आज याच अभिनेत्रीला त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर मिळतेय, अशी चर्चा आहे

१९९१ साली आलेला 'फूल और काँटे' सिनेमा सर्वांना माहित असेलच. याच सिनेमातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं. याशिवाय त्याची हिरोईन होती अभिनेत्री मधू.

अभिनेत्री मधूने 'फूल और काँटे' सिनेमानंतर अनेक बॉलिवूड आणि साउथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय. मधूने एका मुलाखतीत एक खास खुलासा केला होता.

५० वर्षांच्या असणाऱ्या मधूला २० वर्षांच्या मुलीची भूमिका मिळणार नाही, याची जाणीव आहे. पण तरीही या वयात मनसारख्या भूमिका मिळत नसल्याने मधूने इंडस्ट्रीला रामराम ठोकला

मधूने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, "माझं वय जरी वाढलं असलं तरीही मी अजय देवगणच्या आईच्या भूमिकेची ऑफर स्वीकारु शकत नाही."

"मी आणि अजयने एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असल्याने हे मी नाही करु शकत. अर्थात तरीही भूमिका आव्हानात्मक असेल तर मला करायला काहीच हरकत नाही", असं मधू म्हणाली होती.

मधू गेल्या काही वर्षांपासून मोजक्याच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसत आहे. मधूने काही महिन्यांपूर्वी समांथासोबत 'शांकुतलम' सिनेमात अभिनय केलेला

मधूने १९९१ साली आलेल्या 'फूल और काँटे' सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. मधू आणि अजय देवगणचा हा सिनेमा चांगलाच गाजलेला.