पाकिस्तानी चित्रपट 'द लीजेंड ऑफ मौला जट' भारतात रिलीज होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 17:13 IST2022-12-31T17:12:43+5:302022-12-31T17:13:12+5:30

अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' पाकिस्तानमध्ये चांगली कमाई करत आहे. (फोटो- यूट्यूब)
हा चित्रपट भारतात 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु झाला नाही. (फोटो- यूट्यूब)
पीटीआय भाषाला सांगितले, “वितरकांनी आम्हाला कळवले आहे की चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. ही माहिती आम्हाला २-३ दिवसांपूर्वी देण्यात आली होती. यापुढील कोणतीही तारीख आमच्यासोबत शेअर केलेली नाही.” (फोटो- यूट्यूब)
'द लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटात फवाद खान आणि माहिरा खान मुख्य भूमिकेत आहेत. (फोटो- यूट्यूब)
या चित्रपटात हमजा अब्बासी, हुमैमा मलिक, गौहर रशीद, शमून अब्बासी, अली अजमत आणि अदनान जाफर यांच्याही भूमिका आहेत. (फोटो- यूट्यूब)