सेलिब्रिटींसोबत दिसणारा हा ओरी आहे तरी कोण? खुद्द त्यानेच दिलं उत्तर, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 01:31 PM2023-11-23T13:31:49+5:302023-11-23T13:38:20+5:30

Orry: ओरीने मुंबई,तामिळनाडू, न्यूयॉर्क, लंडन आणि कॅनडा या ठिकाणी उच्चशिक्षण घेतलं आहे.

सध्या सोशल मीडियावर ओरी या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. सारा अली खान, अनन्या पांडे, निसा देवगण, जान्हवी कपूर यांसारख्या अभिनेत्रींसोबत कायम तो बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येतो.

ओरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणाचं खरं नाव ओरहान अवात्रामणि असं आहे. कायम सेलिब्रिटींमध्ये दिसणारा ओरी अनेकांच्या चर्चेचं केंद्रबिंदू आहे. यात त्याच्या प्रोफेशनविषयी जाणून घेण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.

अलिकडेच तो इशा अंबानीच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीमध्येही दिसून आला होता. त्यामुळे हा ओरी नेमका आहे कोण? तो काय करतो? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

'कॉफी विद करण'च्या 8 व्या सीझनमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनादेखील ओरीविषयी विचारण्यात आलं. मात्र, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं.

सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्यावर ओरीनेच आता तो नेमका कोण आहे वा तो काय करतो यावर भाष्य केलं आहे. त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

"मी जगतोय, मी जगणार आहे आणि मी जगण्यासाठीच आहे", असं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही याविषयी भाष्य केलं आहे.

'भाई तू काय करतोस हा प्रश्न पुन्हा कोणी मला विचारु नये' असं मला वाटत,असं ओरीने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनेकांना असं वाटतं की ओरी मूळचा मुंबईचा आहे. पण, तो मुंबईचा नसून कोडाइकनाल येथील आहे. त्याचं सगळं बालपण तिथेच गेलं आहे.

ओरीने मुंबई,तामिळनाडू, न्यूयॉर्क, लंडन आणि कॅनडा या ठिकाणी उच्चशिक्षण घेतलं आहे.