"दिलबर गर्ल" नोराचे हे फोटो पाहून चुकला ना काळजाचा ठोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 18:39 IST2024-03-29T18:20:05+5:302024-03-29T18:39:13+5:30
अभिनेत्री नोरा फतेहीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अप्रतिम बेली डान्स आणि आपल्या अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.
नोरा फतेहीच्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.
अभिनेत्री नोरा फतेहीनं नुकतचं एक फोटो शूट केलं आहे. नोरा फेतहीचं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय आहे.
फोटोंमधील नोरा फतेहीच्या हटके लूकवर चाहते फिदा झाले आहेत. नोरा फतेही यामध्ये खूपच आकर्षक आणि सूंदर दिसते आहे.
काळ्या रंगाचा शर्ट आणि स्टायलिश पँटमध्ये नोरा कुल दिसत आहे.
नोराचा फतेहीचा हा कॅज्युअल आउटफिट चाहत्यांना पसंत पडला आहे.
नोराने हलका मेकअप, गॉगल आणि केस मोकळे सोडून हा लूक पुर्ण केला आहे.
नोरा फतेही अनेकदा तिच्या किलर ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.
चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे तिला चांगलंच माहीत आहे.
नोरा फतेही आज बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन आहे.