अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला पण लोकांना तिच्यात ‘माधुरी’ दिसली आणि तिथेच बिनसलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:09 AM2023-09-26T08:09:00+5:302023-09-26T08:10:01+5:30

अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला आणि अचानक तिने इंडस्ट्री सोडली. कारण काय तर माधुरी... होय, ती माधुरी दीक्षित सारखी दिसायची हीच तिची चूक होती...!!

नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं निक्की अनेजा. या अभिनेत्रीबाबत तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. मात्र हिची खास ओळख म्हणजे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिची डुप्लिकेट होती.

मिस्टर आजाद या सिनेमातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणा-या निक्कीला बॉलीवुडला रामराम का करावा लागला याचा खुलासा खुद्द तिनेच केला होता. भावानं केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने आपला पहिला पोर्टफोलिओ बनवला.

यानंतर निक्कीचं नशीब जणू काही पालटलं. तिचा पोर्टफोलिओ पाहून तिला जाहिरातीच्या विविध ऑफर्स येऊ लागल्या. तिची पहिली कमाई 8 हजार रुपये होती. आज निक्की तिचा वाढदिवस साजरा करतेय.

अनिल कपूरसोबत पहिला सिनेमा केला आणि अचानक तिने इंडस्ट्री सोडली. कारण काय तर माधुरी... होय, ती माधुरी दीक्षित सारखी दिसायची हीच तिची चूक होती...

निक्कीला खरं तर कधीच अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिला बनायचं होतं पायलट. पण भावानं तिला मॉडेलिंगचा सल्ला दिला आणि तिनं तिचा पहिला पोर्टफोलियो बनवला. तो पोर्टफोलियो पाहून तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या.

बघता बघता ती मॉडेलिंग क्षेत्रातलं मोठ्ठं नाव बनली. अर्थात हे काही काळ. मॉडेलिंग क्षेत्रात ग्लॅमर होतं, पैसा होता, प्रसिद्धी होती. पण कदाचित निक्कीला हवी असलेली शांती नव्हती.

अचानक तिने सगळं सोडलं आणि ती सगळं काही सोडून तिच्या वडिलांकडे राहायला गेली. पण नियतीने तिच्या नशीबी हिरोईन बनण्याचं आधीच लिहिलं असावं.

यावेळी तिच्या बाबांनी तिला आग्रह केला. बाबांच्या आग्रहाखातर तिने अनिल कपूरच्या ‘मिस्टर आझाद’ हा सिनेमा साईन केला. हा सिनेमा चांगला चालला. पण अनेकांना निक्कीला पडद्यावर पाहून तिच्या माधुरी दीक्षित दिसू लागली.

त्यावेळी माधुरी मोठी स्टार होती आणि निक्की एक नवखी अभिनेत्री. पण तरिही निक्कीची माधुरीसोबत निक्कीची तुलना होऊ लागली. हळूहळू माधुरीची डुप्लिकेट हा शिक्काच तिच्यावर बसला. दुसरी कुणी असती ती माधुरीची डुप्लिकेट म्हणून मिरवली असती. पण निक्की या तुलनेला कंटाळली.

याचदरम्यान तिच्या बाबांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानं निक्कीला जबर धक्का बसला आणि तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. यानंतर बऱ्याच वर्षानंतर ती पुन्हा अभिनयाकडे वळली.