नेहा कक्करनं पांढऱ्या टॉपववर परिधान केली ब्रा, विचित्र बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 12:10 IST2025-07-08T12:04:16+5:302025-07-08T12:10:40+5:30

नेहा कक्करचा विचित्र बोल्ड लूक, पांढऱ्या टॉपवर ब्रा आणि दोन ट्रॅकपँट घालून आली स्टेजवर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

लोकप्रिय गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही बोल्ड डिझाइनर आउटफिट परिधान करण्यास कधीही मागेपुढे पाहत.

बोल्ड व हॉट स्टाइल स्टेटमेंटमुळेच ती नेहमी चर्चेत असते. नेहा स्टायलिश आणि फॅशनेबल आहेच, पण तिच्या ड्रेसिंग स्टाइलमध्येही बरेच हटके प्रयोग पाहायला मिळतात.

एअरपोर्ट लुक, रेड कार्पेट फॅशन आणि कौटुंबिक सोहळ्यामध्येही नेहा जबरदस्त लुक कॅरी करते. पण कधी- कधी अति स्टायलिश पेहरावामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलर्सचा देखील मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो.

कारण नेहानं विचित्र आणि रंगसंगतीचे आउटफिट्स परिधान केल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे तिला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय.

सोमवारी नेहानं इंस्टाग्रामवर तिच्या अलिकडच्या स्टेज परफॉर्मन्सचे काही फोटो शेअर केले. ज्यामधील तिचा लूक चर्चेत आलाय.

नेहाने पांढऱ्या टॉपवर निळ्या रंगाची ब्रा (Neha Kakkar Wear Bra Over White) परिधान केली होती आणि एकावर एक दोन ट्रॅकपँट्स घातल्या होत्या. तर वरची पँट सैल आणि थोडी लहान असल्याने संपूर्ण लूक विचित्र वाटत होता.

या फोटोंवरील कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी तिच्या फॅशन सेन्सवर नाराजी व्यक्त करत तीव्र शब्दांत टीका केली आहे.

एका युजरनं लिहिलं, "ती नेहमीच काहीतरी विचित्रच करते". तर काही नेटकऱ्यांनी तिला सुपरमॅनची उपमा दिली. कारण जसे सुपरमॅनने त्याच्या कपड्यांवर अंडरवेअर घातले असते, तसाच तिचा लूक वाटत होता.

यावेळी नेहाकडे लबूबू बाहुलाही दिसून आला. — छोटू बॉडी, मोठ्ठाले डोळे, टोकदार उभे कान, आणि बाहेर निघालेले राक्षसी दात असा हा लबूबू बाहुला ट्रेडिंगमध्ये आहे. जगभरात लबूबू बाहुल्यांचं वेड आणि आकर्षण वाढलंय.

दरम्यान, caknowledge या वेबसाईटनुसार, नेहाची नेटवर्थ सुमारे ३८ कोटी रूपये आहे. चित्रपटांमध्ये ती एका गाण्यासाठी १०-१५ लाख रुपये घेते.

नेहा ही २००६ मध्ये 'इंडियन आयडॉल २' एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत.