नसीब अपना अपना:विचित्र हेअर स्टाइल करणारी चंदू आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे कमालीची ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:00 AM2022-08-01T07:00:00+5:302022-08-01T07:00:00+5:30

Radhika sarathh kumar: राधिका कुमार या खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर दिसत असून आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत.

1986 साली प्रदर्शित झालेला नसीब अपना अपना हा चित्रपट अनेकांना आठवत असेल. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट विशेष गाजला होता.(photo: youtube)

या चित्रपटात ऋषी कपूरसोबत अभिनेत्री राधिका कुमार हिनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपट चिंदू ही भूमिका साकारुन ती विशेष चर्चेत आली.

चित्रपटात चंदू म्हणजेच राधिका कुमार तिच्या हटके हेअर स्टाइल आणि संवादफेक कौशल्यामुळे लोकप्रिय झाली होती. त्यामुळे सध्या ही अभिनेत्री काय करते? कशी दिसते असे प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.

राधिका कुमार दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

राधिका कुमार कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम त्यांचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

राधिका कुमार आज ५९ वर्षांच्या आहेत. मात्र, या वयातही त्या प्रचंड ग्लॅमरस असल्याचं पाहायला मिळतं.

राधिका कुमार या खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर दिसत असून आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत.

राधिका कुमार बरेचदा विदेश दौऱ्यावर जातात. त्यामुळे येथील अनेक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

राधिका यांच्याकडे पाहिल्यावर त्या ५९ वर्षांच्या आहेत यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.