धुळ्याची मुलगी मृणाल ठाकूर 'या' सेलिब्रिटीच्या प्रेमात होती वेडी, नच बलिएमध्ये दिसलेली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:40 IST2025-07-16T15:20:40+5:302025-07-16T15:40:48+5:30

Mrunal Thakur: मृणालच्या या एक्स बॉयफ्रेंडला फॉलो करतो झाकीर खान, 'पंचायत'च्या प्रल्हादचाही मित्र; का झालं दोघांचं ब्रेकअप

'सीतारामम' सिनेमामुळे ज्या अभिनेत्रीच्या सर्वच प्रेमात पडले ती मृणाल ठाकूर (Mrunal Thakur). धुळ्यातील मराठी कुटुंबात जन्माला आलेली मृणाल आज हिंदी, साऊथ सिनेमांमध्ये डंका गाजवत आहे.

टीव्ही ते सिनेमा असा अभिनेत्रीचा प्रवास राहिला आहे. २०१४ साली ती 'कुमकुम भाग्य' मालिकेत दिसली होती. तिने यामध्ये बुलबुलची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला वेगळी ओळख दिली.

याशिवाय मृणालने 'मुझसे कुछ कहती है खामोशियां', 'अर्जुन', 'सौभाग्यलक्ष्मी' या मालिकांमध्येही काम केलं आहे. तसंच ती २०१४ साली आलेल्या 'विटी दांडू' या मराठी सिनेमातही दिसली. यानंतर 'सुराज्य' हा मराठी सिनेमाही तिने केला.

मृणालला २०१६ साली आलेल्या'लव्ह सोनिया' सिनेमामुळेही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. नंतर ती हृतिक रोशनसोबत 'सुपर ३०'मध्ये दिसली. मात्र 'सीतारामम' सिनेमामुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली.

करिअरमध्ये यशाचं शिखर गाठत असताना मृणालच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा होते. तिचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं. मात्र काही वर्षांपूर्वी तिचं एक प्रेमप्रकरण खूप गाजलं होतं.

१० वर्षांपूर्वी मृणाल आणि शरद त्रिपाठीचं अफेअर चर्चेत होतं. दोघंही 'नच बलिए ७' डान्स रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले होते.

दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र दोघांच्या कुटुंबातून त्यांच्या नात्याला विरोध होता. दोघंही आपापल्या घरी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते शक्य झालं नाही.

नच बलिए शो संपल्यानंतर दोघांचं ब्रेकअपही झालं. त्यांनी आपापली वाट धरली. त्यांच्या ब्रेकअपचीही तितकीच चर्चा झाली होती.

शरद त्रिपाठी लेखक, दिग्दर्शक आहे. त्याने लिहिलेली पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. तसंच तो अनेक स्टॅण्डअप शोजमध्ये त्याच्या कविता सादर करतो.