Then And Now : ‘मोहब्बतें’ची प्रिती झांगियानी आठवते? आता कशी दिसते तेही बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 08:00 AM2022-02-22T08:00:00+5:302022-02-22T08:00:07+5:30

Preeti Jhangiani : प्रिती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणंही कठीण होईल.

सन 2003 साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. याच चित्रपटातील एक चेहरा म्हणजे, ‘मोहब्बतें’ गर्ल प्रिती झांगियानी. प्रिती आज बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण सोशल मीडियावर मात्र कमालीची सक्रिय आहे. अर्थात इतक्या वर्षांत ही ‘मोहब्बतें’ गर्ल इतकी बदललीय की, तिला ओळखणंही कठीण होईल.

‘मोहब्बतें’ या चित्रपटानंतर प्रितीने बॉलिवूडमध्ये टिकून राहण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण दुदैर्वाने यानंतरचे तिचे चित्रपट धडाधड आपटलेत. एलओसी,आन,अनर्थ या चित्रपटात ती दिसली. पण तिचे हे चित्रपट सुपरडुपर फ्लॉप ठरलेत. अखेर प्रितीने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.

सर्वप्रथम राजश्री प्रोडक्शनच्या ‘ये है प्रेम’मध्ये ती झळकली. त्यानंतर ‘छुई मुई सी तुम लगती हो’ आणि ‘कुड़ी जच गई’ या गाण्यात ती दिसली. या गाण्यांमुळे प्रितीला कमालीची लोकप्रियता मिळाली. पुढे प्रितीने काही जाहिरातीही केल्या. पण जम बसत नाही म्हटल्यावर तिने बॉलिवूड करिअर सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये मला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हती. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला चित्रपटांची निवड करताना मी अनेक चुका केल्यात. पण म्हणून माझे करिअर पूर्णपणे अयशस्वी ठरले असे मी म्हणणार नाही,असे एका मुलाखतीत प्रिती म्हणाली होती.

निर्माता फिरोज नाडियाडवलाचा भाऊ मुश्ताक खानसोबत लग्न करून ती संसारात रमली. पण हे लग्नही फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला.

यानंतर तिने मॉडेल व अ‍ॅक्टर प्रवीण डब्बाससोबत दुसरं लग्न केलं. प्रितीचा पती प्रवीण अभिनेता आहे शिवाय स्कुबा ड्रायव्हिंगही करतो. त्याला अंडरवॉटर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचीही आवड आहे.

2011 मध्ये प्रितीने पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जयवीर आहे. यानंतर 2016मध्ये प्रिती दुसऱ्यांदा आई बनली.

प्रिती सध्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. आपल्या मुलांच्या संगोपनात ती बिझी आहे. प्रितीचा ‘मोहब्बतें’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण या चित्रपटातील किम शर्मा व शमिता शेट्टी यांच्यासारखेच प्रितीचे करिअरही फ्लॉप राहिले.