'मिर्झिया' फेम सैयामी खेरचा स्टाइलिश लूक, वांद्रेमध्ये झाली स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 17:24 IST2018-11-15T17:20:54+5:302018-11-15T17:24:00+5:30

'मिर्झिया' फेम अभिनेत्री सैयामी खेरचा बोल्ड व स्टाइलिश लूकमध्ये वांद्रे येथे दिसली.

सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'माऊली' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सैयामी पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखसोबत 'माऊली' चित्रपटात काम करणार आहे.

सैयामी मराठी अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.

तर अभिनेत्री तन्वी आझमी तिची आत्या आहे आणि त्यांनी रितेश सोबत लय भारी चित्रपटात काम केलेले आहे. या चित्रपटात त्यांनी रितेशच्या आईची भूमिका केली होती.