न्यूड फोटोशूटमुळे वादात अडकला! १४ वर्षे खटला लढला; अर्ध्या वयाच्या गर्लफ्रेंडसोबत संसार थाटून जगतोय 'असं' आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:02 IST2025-11-04T16:47:58+5:302025-11-04T17:02:21+5:30
न्यूड फोटोशूटमुळे वादात अडकलेला 'हा' अभिनेता; करिअर लागलं होतं पणाला, आता काय करतो?

बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी काही सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक नाव म्हणजे अभिनेता मिलिंद सोमण.

अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला.

इंडस्ट्रीतील 'आयर्नमॅन' म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमणचा वयाच्या पन्नाशीतला फिटनेस अनेक तरुणांना लाजवणारा आहे.

छोट्या पडद्यावरील 'भूत बना दोस्त'या मालिकेत त्याने काम करत त्याने आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं.. त्याचबरोबर २००७ मध्ये तो 'भरम','सलाम भारत' आणि 'भेजा फ्राय' या चित्रपटांमधेही दिसला. २००९ मध्ये त्याने सचिन कुंडलकरच्या 'गांधी' या मराठी चित्रपटात सुद्धा अभिनय केला आहे..

आज या अभिनेत्याचा वाढदिवस आहे. मिलिंद सोमणचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी ग्लासगो, स्कॉटलंड यूके येथे झाला.त्याचे वडील प्रभाकर सोमण हे शास्त्रज्ञ आहेत तर आई उषा सोमण बायो-केमिस्ट शिक्षिका आहेत.

त्यानंतर मिलिंद ७ वर्षांचा असताना त्यांचं कुटुंब मायदेशी परतलं. मुंबईतील दादरमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. तसंच त्याने अभियांत्रिकीचं शिक्षणही घेतलं आहे. पण, अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात करिअर मार्गी लागत असताना अभिनेता एका वादात अडकला होता.

१९९५ साली एका फोटोमुळे मिलिंद चर्चेत आला. मिलिंद आणि मॉडेल मधु सप्रे यांचा एक न्यूड फोटो त्यावेळी प्रसिद्ध झाला होता. या फोटोमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. यामुळे त्याला जवळपास १४ वर्षे कायदेशीर लढाई लढावी लागली.

२२ एप्रिल २०१८ साली मैत्रीण अंकिता कंवरशी केलेल्या लग्नामुळे तो पुन्हा चर्चेत आला. त्या दोघांच्या वयामध्ये २५ वर्षांचे अंतर आहे. हे लग्न अलिबाग येथे झाले होते.हे दोघंही सध्या त्यांच्या सुखी संसारात रमले आहेत.

















