Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 09:01 IST2025-05-06T08:55:52+5:302025-05-06T09:01:17+5:30
Met Gala 2025: मेट गाला २०२५ ५ मे पासून सुरू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये पार पडत असलेल्या या भव्य कार्यक्रमात बॉलिवूडचा दबदबा दिसून आला. एकीकडे कियारा आडवाणीने तिच्या बेबी बंपने कॅमेरा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले. दुसरीकडे, शाहरुख खानच्या सिग्नेचर स्टाईलने पुन्हा एकदा तो किंग खान असल्याचे सिद्ध केले.

मेट गाला २०२५ ५ मे पासून सुरू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये पार पडत असलेल्या या भव्य कार्यक्रमात बॉलिवूडचा दबदबा दिसून आला. एकीकडे कियारा आडवाणीने तिच्या बेबी बंपने कॅमेरा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले. दुसरीकडे, शाहरुख खानच्या सिग्नेचर स्टाईलने पुन्हा एकदा तो किंग खान असल्याचे सिद्ध केले.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत होती. आता ती मेट गालामध्ये पहिल्यांदा सामील झाली आहे. जेव्हा तिने तिच्या काळ्या, पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या. अभिनेत्रीच्या ड्रेसला 'ब्रेव्हहार्ट्स' असे नाव देण्यात आले होते, जे महिलांच्या शक्तीचे, मातृत्वाचे आणि बदलाच्या नवीन टप्प्याचे प्रतीक आहे.
इव्हेंटमध्ये कियारा तिच्या खास लूकबद्दल म्हणाली, ''एक कलाकार आणि आई होणारी महिला म्हणून, हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. मेट गालासारख्या व्यासपीठावर या खास टप्प्याचे चित्रण करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.''
बॉलिवूडच्या किंग खानने त्याच्या काळ्या रंगाच्या पोशाखात मेट गाला २०२५ इव्हेंटला चारचाँद लावले. त्याची सिग्नेचर पोझ आणि 'के' चिन्ह असलेली साखळी आणि हातात रॉयल स्टिकसह, त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की इंडस्ट्रीचा तो एकमेव किंग खान आहे.
पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने त्याच्या पारंपारिक शीख पोशाखात रेड कार्पेटवर प्रवेश केला. यावेळी तो पूर्णपणे पांढऱ्या पोशाखात राजा असल्यासारखा रॉयल दिसत होता. तलवारीने त्याचा लूक सुंदरपणे पूर्ण केला.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनीही त्यांच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे प्रियांका पांढऱ्या आणि काळ्या पोल्का डॉट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती तर दुसरीकडे निक पांढऱ्या शर्ट आणि काळ्या ट्राउझर्समध्ये देखणा दिसत होता.
यावेळी मेट गाला २०२५ मध्ये अनेक भारतीय स्टार्सनी हजेरी लावली, ज्यात शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, कियारा अडवाणी, मनीष मल्होत्रा आणि प्रियांका चोप्रा यांसारखी नावे होती. याशिवाय संगीत, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रातील कलाकारांनीही सहभाग घेतला.