आधी छोट्याश्या घरात राहत होती सोशल मीडिया स्टार मनीषा राणी; मुंबईत खरेदी केले आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 19:17 IST2023-10-16T19:02:29+5:302023-10-16T19:17:57+5:30

सोशल मीडिया स्टार मनीषा राणी नुकतीच तिच्या नव्या घरात राहायला गेली आहे. तिने तिच्या नव्या घराची झलक शेअर केली आहे.

मनिषा राणी इन्स्टाग्रामवर तिच्या फनी व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे. मनिषा ही डान्सर, अभिनेत्री आणि एंटरटेनर आहे.

बिहारमधील एका छोट्या गावातली ही मुलगी स्टार बनली असून मनीषा अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये बॅक टू बॅक दिसत आहे.

यंदाच्या बिग बॉस ओटीटी २ ची सेकंड रनर अप असलेली मनिषा कायमच चर्चेत असते. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर मनीषाने नवीन घर घेतले आहे. याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये सुरुवातील ती आपलं जुनं घर दाखवते.

यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आपल्या जुन्या घरातील अनेक आठवणी शेअर केल्यात. तसेच जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट होण्यात एक वेगळीच मजा आहे, असेही ती म्हणाली.

व्हिडीओमध्ये मनीषाने तिच्या नव्या घरातील बाल्कनीची झलक दाखवली. 'मला नेहमीच बाल्कनी असलेले घर हवे होते आणि मुंबईत असे घर मिळणे कठीण आहे', असं तिने म्हटलं.

तिचं घर एकदम प्रशस्त​ आहे. शिवाय आपल्या नव्या घरात सुंदर असं स्वयंपाकघर तिनं बनवून घेतलं आहे.

मनिषाचा बेडरुम भलामोठा असून त्यात खास वॉडरोब आहे. शिवाय, तिनं बाथरुममध्ये आरसा बसवून घेतला आहे. अनेक वर्षांपासून तिला स्वतःचे घर घ्यायचे होते, आता तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

व्हिडिओच्या शेवटी, ती तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत दिसते. घरात पुर्ण फर्निचर केल्यावर पुन्हा एक व्हिडीओ शेअर करेल असे तिने सांगितलं.