Photos : "धकधक गर्ल" माधुरी दीक्षितचे सुंदर फोटो, काळ्या साडीत बहरलं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:41 IST2024-11-12T17:35:31+5:302024-11-12T17:41:35+5:30
सध्या माधुरी दीक्षित तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

एव्हरग्रीन अभिनेत्री अर्थात बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अजूनही तितकीच सुंदर आणि मोहक दिसते.
तिची दिलखेचक अदाकारी आणि अभिनयाचा चाहतावर्ग फार मोठा आहे.
57 वयातही माधुरी इतकी तरुण, फिट आणि तिच्या टवटवीत त्वचेबद्दल अनेकांना कुतुहूल वाटते.
सध्या माधुरी दीक्षित तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काळ्या रंगाच्या साडीवर गोल गळ्याचा ब्लाऊज तिने परिधान केला. यात माधुरी दीक्षित प्रचंड सुंदर दिसत आहे.
या हटके लुकसाठी माधुरीने गोल्डन कानातले परिधान केले. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर माधुरी ही 'भूल भुलैया 3' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.