मादाम तुसाद इंडियाने वरुण धवनच्या मेणाच्या पुतळ्याचे केले अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:55 PM2022-12-14T18:55:54+5:302022-12-14T18:59:13+5:30

Varun Dhawan : वरुण धवनने स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि कमी कालावधीत त्याने रसिकांच्या मनात घर केले.

वरुण धवनने २०१२ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि आलिया भटसोबत स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या १० वर्षांत तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला.

नुकताच त्याचा भेडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

मादाम तुसाद संग्राहलयात अभिनेता वरुण धवनचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे आणि या पुतळ्याचे नुकतेच अनावरण केले आहे.

मादाम तुसाद इंडियाने बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या मेणाचा पुतळ्याचे अनावरण केले आहे. नोएडा येथील डीएलएफ मॉल ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या संग्रहालयामध्ये मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले.

वरुण धवन हा अनेक पिढ्यांमधील प्रसिद्ध आणि प्रशंसनीय असलेला अभिनेता आहे. या अष्टपैलू अभिनेत्याने 2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, एबीसीडी (ABCD) 2 आणि बदलापूर यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांसाठी देखील त्याचे कौतुक झाले.

या तरुण सुपरस्टारचे जगभरात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत आणि मेणाची आकृती त्याच्या चाहत्यांसाठी एक अतिरिक्त आनंद असेल, जे त्यांच्या नायकाच्या शेजारी फोटो काढू शकतील.