जॅकी दादाच्या लेकीला बघितलंत का ! अथियाच्या लग्नात बोल्ड अॅंड ब्युटिफुल कृष्णा श्रॉफचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 10:18 IST2023-01-26T10:12:20+5:302023-01-26T10:18:49+5:30

जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफ कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

अभिनेता जॅकी श्रॉफ ची लेक कृष्णा श्रॉफ लाईमलाईटपासून दूर असते. तरी खऱ्या आयुष्यात ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तसंच भाऊ टायगर श्रॉफ सारखीच ती देखील फिटनेसफ्रिक आहे.

नुकतीच ती अथिया शेट्टी आणि के एल राहुलच्या लग्नसोहळ्यात सामील झाली होती. पारंपारिक लुक मधील फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

व्हाईट लेहेंग्यातील या फोटोंमध्ये कृष्णा कमालीची सुंदर दिसत आहे. चाहतेही तिच्या या फोटोंवर घायाळ झाले आहेत.गळ्यात सुंदर भरजरी हार, हातात ब्रेसलेट आणि छानशी हेअरस्टाईल असा तिचा लुक आहे.

कृष्णा सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. तिचे फिटनेससंबंधित फोटो व्हिडिओ ती अपलोड करत असते. प्रसिद्धीपासून दूर असूनही तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

कृष्णा ३० वर्षांची असून डॉक्युमेंटरी मेकर म्हणून ती कार्यरत आहे. तसेच ती उत्तम बास्केटबॉल प्लेयर आहे. तिचे स्वत:चे फिटनेस सेंटरही आहे. MMA Matrix Fitness Centre असे त्याचे नाव आहे.

कृष्णा अनेक मॅगझीन्सच्या कव्हरवर मध्ये झळकली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या फिटनेसमुळे अनेक जण तिला फॉलो करतात.

भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देईल असा कृष्णाचा अंदाज आहे. मात्र तिचा बॉलिवुडमध्ये अभिनय करण्याचा कोणताही विचार नाही असं तिच्या कुटुंबाने सांगितलं आहे. तरी ती अनेक बॉलिवुड पार्ट्यांमध्ये दिसत असते.

कृष्णाचे वजन १५ वर्षांपर्यंत खूपच जास्त होते. मात्र भाऊ टायगरची प्रेरणा घेऊन तिने मेहनत घेतली. कोणतीही नकारात्मकता येऊ न देता तिने शरीरावर लक्ष दिले. त्यामुळेच आज ती टायगर प्रमाणेच अगदी फिट आहे.