Koffee With Karan 8: करीनापासून रणवीर सिंग पर्यंत या सेलेब्सनी शोमध्ये ओपन केले बेडरुम सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:25 PM2023-10-27T12:25:00+5:302023-10-27T12:31:18+5:30

Koffee With Karan 8: करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण'मध्ये सेलेब्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करतात. या शोमध्ये अनेक स्टार्सनी त्यांच्या बेडरूमचे सीक्रेट्सही शेअर केले आहेत.

करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो 'कॉफी विथ करण'मध्ये सेलेब्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करतात. या शोमध्ये अनेक स्टार्सनी त्यांच्या बेडरूमचे सीक्रेट्सही शेअर केले आहेत.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये रणवीर सिंगने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. यावेळी त्याने आपल्या लग्नाच्या रात्रीचा खुलासाही केला. लग्नाच्या रात्री तो 'खूप ऑन' होता असे त्याने सांगितले होते.

करीना कपूरनेही 'कॉफी विथ करण'मध्ये तिचे बेडरूमचे सीक्रेट शेअर केले आहे. या शोमध्ये तिच्यासोबत प्रियांका चोप्रा देखील उपस्थित होती. यादरम्यान, बेडरूमच्या क्षणाचा खुलासा करताना, बेबो म्हणाली, 'मी आज सकाळीच खूप प्रेमळ टाइम व्यतित केला', जे ऐकून प्रियांकाने तिला चिअर अप केले.

प्रियंका चोप्राने शोमध्ये तिच्या बेडरूमचे सीक्रेट्सही उघड केले आहे. वास्तविक, 'कॉफी विथ करण'मध्ये, करणने तिला विचारले होते की तिने कधीही अंथरुणावर रोल प्ले करण्यासाठी स्वतः छान तयार होतेस का? ज्याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली होती, "मी एवढी मेहनत करत नाही. त्याची गरज नाही."

'कॉफी विथ करण'मध्ये ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारही दिसले आहेत. त्यादरम्यान करणने ट्विंकल खन्नाला विचारले होते की, तीन खानांकडे जे नाही ते अक्षय कुमारकडे आहे? याला उत्तर देताना अभिनेत्रीने 'काही एक्स्ट्रा इंच' असे गमतीने उत्तर दिले होते. हे ऐकून अक्षय थक्क झाला.

'कॉफी विथ करण'मध्ये त्यांच्या बेडरूमचे रहस्य उघड करताना मीरा राजपूत आणि शाहिद कपूर म्हणाला होता की, 'अनेक वेळा तो कपड्यांशिवाय झोपतो.' हे ऐकून करणला आश्चर्य वाटले आणि विचारले, 'तू कपड्यांशिवाय झोपतो का?' ज्यावर शाहिद मस्करीमध्ये म्हणाला होता- तू नाही झोपत ?

'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री विद्या बालनला विचारण्यात आले होते की, अॅक्टनंतर तिला चॉकलेट, ग्रीन टी आणखी एका राउंडमध्ये काय घ्यायला आवडेल? ज्याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली होती, 'पाणी, कारण तहान शमवताना आणखी तहान लागते.'

करण जोहरच्याच शोमध्ये फराह खानने त्याला त्याच्या बेडरूमच्या सिक्रेटबद्दल प्रश्न विचारला होता. फराहने करणला त्याच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारला होता. ज्याच्या उत्तरात चित्रपट निर्मात्याने म्हटले होते, अस्तित्वात नाही, लागू नाही आणि पूर्णपणे अनावश्यक आहे.