कोण आहे 'चंदू चॅम्पियन'ची मिस्ट्री गर्ल? खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:04 PM2024-05-27T13:04:02+5:302024-05-27T13:12:45+5:30

Chandu champion mystery girl:भाग्यश्री चंदू चॅम्पियननंतर विजय देवरकोंडाच्या VD12 या सिनेमात झळकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर विशेष लोकप्रिय ठरत असून त्यातील मिस्ट्री गर्ल सध्या चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण याचा शोध प्रेक्षक घेत आहेत.

सोशल मीडियावर चर्चेत येत असलेली चंदू चॅम्पियन या सिनेमातील मिस्ट्री गर्ल बॉलिवूडसह साऊथ सिनेमांमध्येही झळकली आहे.

चंदू चॅम्पियनच्या मिस्ट्री गर्लचं नाव भाग्यश्री बोरसे असं असून ती मूळची पुण्याची आहे.

२०२३ मध्ये ती यारिया 2 या सिनेमात झळकली होती. मात्र, त्यात तिची अत्यंत लहान भूमिका होती. या सिनेमाच्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती.

भाग्यश्रीने तेलुगू इंडस्ट्रीतही काम केलं आहे. रवि तेजासोबत मिस्टर बच्चन या सिनेमात ती झळकली होती.

भाग्यश्रीने विदेशात तिचं शिक्षण घेतलं असून भारतात परतल्यानंतर तिने मॉडलिंग क्षेत्रात नशीब आजमावलं. तिने काही ब्रँडसाठीही काम केलं आहे.