Rani Mukherjee Birthday: अगदी राणीसारखी जगते राणी मुखर्जी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:23 PM2023-03-21T13:23:57+5:302023-03-21T13:32:42+5:30

Rani Mukherjee Birthday: बॉलिवूडची बबली राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. राणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केलं. १९९६ साली तिचा डेब्यू झाला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडची बबली राणी मुखर्जी आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. राणीने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केलं. १९९६ साली तिचा डेब्यू झाला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

1996 मध्ये 'राजा की आयेगी बारात' हा राणीचा पहिला सिनेमा. त्यानंतर 'कुछ कुछ होता है', 'बंटी और बबली', 'कभी अलविदा ना कहना' आणि 'मर्दानी' यासारख्या सिनेमांत ती झळकली.

राणी मुखर्जीला लक्झरी लाइफ जगायला आवडते. आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी राणी मुखर्जी ही कोट्यवधींची मालकीण आहे. कोट्यवधींच्या घरात ती राहते. अलिशान गाड्यांमध्ये फिरते.

राणी पती आदित्य चोप्रा आणि मुलगी आदिरासोबत मुंबईत राहात असली तरी अभिनेत्रीने वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. मध्यंतरी तिने एक अपार्टमेंट घेतलं होतं. ज्याची किंमत 7 कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं गेलं होतं.

राणी मुखर्जीला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. राणीकडे Audi A8 W12 आहे ज्याची किंमत सुमारे 2 कोटी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार राणीला तिचा पती आदित्यने गिफ्ट म्हणून दिली होती. याशिवाय तिच्याकडे मर्सिडीज एस क्लास आणि मर्सिडीज बेंझ ई क्लास कारही आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीची एकूण संपत्ती 12 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 90 कोटी रुपये आहे.

राणीचा पती आदित्य चोप्रा हा यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, आदित्यची एकूण खासगी संपत्ती ६५०४ कोटींहून अधिक आहे. यशराज फिल्म्समधूनच तो दरवर्षी सुमारे ९६१ कोटी रूपये कमावतो.

राणी मुखर्जीचा 'मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चित्रपट गेल्या 17 मार्चला चित्रपटगृहात रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात राणी मुखर्जीनं एका बंगाली महिलेची भूमिका साकारली आहे.