कियाराने असा साजरा केला सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस, 'सिड'चे चार्मिंग Photos पाहिले का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:57 IST2025-01-17T14:35:22+5:302025-01-17T14:57:33+5:30
सिड-कियारा ही जोडी चाहत्यांची लाडकी आहे.

तरुण, डायनॅमिक, चार्मिंग, हँडसम असं व्यक्तिमत्व असलेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra). कालच त्याने ४० वा वाढदिवस साजरा केला.
नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त कियारा अडवाणीने (Kiara Advani) त्यांचे क्युट फोटो शेअर केलेत. स्पेशल पोस्ट लिहीत तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कियारा आणि सिद्धार्थ ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेलेत तिथले हे फोटो आहेत. कियाराने या फोटोत सिद्धार्थला कॅप्चर केलं आहे. त्याचा हसरा चेहरा प्रेमात पाडणारा आहे.
तसंच तिने हा दोघांचा सेल्फी शेअर केला आहे. यात ते एकदम फ्रेश दिसत आहेत. दोघांनी व्हाईट आऊटफिटमध्ये ट्विनींग केलं आहे.
आणखी एका फोटोत दोघंही रोमँटिक झाले आहेत. कियारा सिद्धार्थच्या मिठीत असून कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे. हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये ती सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थनेही हिरवा फ्लोरल शर्ट घातला आहे.
या फोटोत ते सायकल राईडवर गेले आहेत. सिद्धार्थला कियाराला जवळ घेत कपाळावर किस करताना दिसतोय. तर मागे परदेशातील उंच इमारत आहे. हा फोटो एकदम क्लासिक आला आहे.
कियाराने या फोटोंना 'हॅपी बर्थडे सोलमेट' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोंवर इतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत.