खुशी कपूरचा बोल्ड अँड ब्युटीफूल लूक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 16:34 IST2025-01-12T16:26:09+5:302025-01-12T16:34:22+5:30

खुशीने नुकतेच काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) ही कायम चर्चेत असते.

खुशी कपूर ही बॉलीवूडमधील सर्वात हॉट स्टार किड्सपैकी एक आहे.

खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

नुकतेच खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये खुशी कहर करताना दिसत आहे. तिचा हा लूक खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खुशीनं ग्लॉसी मेकअप केलाय अन् केस मोकळे सोडले आहेत.

वेगवेगळ्या पोझ देत तिनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

खुशी कपूरने 'द आर्चिज' या सिनेमातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

आता लवकरच तिचा 'लव्हयापा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान याच्यासोबत झळकणार आहे.

दोघांची नवी रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर ७ फेब्रुवारीला रिलीज होतोय.

जुनैद-खुशी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'लव्हयापा' सिनेमात नव्या पिढीची अतरंगी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे.