करीना कपूर सारखी फिगर पाहिजे? तिच्या ट्रेनरच्या 'या' ३ टिप्स ठरतील गेमचेंजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:35 IST2025-06-11T17:25:37+5:302025-06-11T17:35:19+5:30

करीनासारखी फिटनेस मिळवायची असेल तर फक्त 'या' ३ गोष्टी फॉलो करा

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) ही सर्वांची आवडती अभिनेत्री. करीनाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

उत्कृष्ट अभिनयासोबतच तिचा आत्मविश्वास, बोल्ड व्यक्तिमत्त्व अनेकांना आवडतं. मात्र, यापेक्षाही अधिक आकर्षक आहे तिचा फिटनेस. ज्याचे गुपित जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.

करीना नेहमीच तिच्या चाहत्यांना फिट Kareena Kapoor Fitness Tips) राहण्यासाठी प्रेरित करते. ती तिचे व्यायामाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते.

'टशन' चित्रपटासाठी तिने झिरो साईज फिगर केलं होतं. त्यानंतर गरोदरपणात वाढलेलं वजनही तिनं कमी करुन चाहत्यांसमोर एक आदर्श ठेवला होता.

करीना कपूर असं काय करते, ज्यामुळे ती इतकी आणि फिट आणि फ्रेश दिसते. आत नुकतंच करीना कपूरच्या फिटनेसचं सीक्रेट उघड केलं आहे.

महेश घाणेकर करीनाला प्रशिक्षण देत आहेत. महेश यांनी तीन टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या फॉलो करून तुम्हीही करीनासारखी फिगर बनवू शकता.

करीना इतर कुठलेही काम करायला विसरेल. पण ती व्यायाम करायला विसरत नाही. ती तिच्या डाएटचीही पूर्ण काळजी घेते. महेश यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, करीना तीन गोष्टी फॉलो (Kareena Kapoor’s Fitness Routine) करते.

महेश यांनी सांगितले की करीनाचे पहिले लक्ष सातत्य राखण्यावर असते आणि त्यानंतर ती वेट ट्रेनिंगकडे वळते. ती आठवड्यातून किमान चार वेळा व्यायाम करते.

ते म्हणाले, "करीना नेहमीच १ तास किंवा त्याहून अधिक ट्रेनिंग करते. या एका तासात ती १४-१५ व्हेरिएशन करते. हे हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग आहे".

तिसरी खास गोष्ट म्हणजे, करीना आहारावर पुर्ण लक्ष असतं. तिचे वजन ६७.५ वरून ६४ किलो पर्यंत कमी झाले आहे आणि येत्या आठवड्यात ती २-३ किलो वजन कमी करणार आहे. महेश यांनी सांगितलं की, वेट ट्रेनिंग तिच्यासाठी खूप चांगले काम करत आहे आणि तिची ताकद वाढत आहे.