फॅशन क्वीन कंगना राणौतच्या बॅगची तुफान चर्चा, किंमत किती? ऐकून अवाक व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:54 IST2025-07-28T18:28:17+5:302025-07-28T18:54:50+5:30
कंगनाची ही बॅग आहे खास, किंमत लाखोंमध्ये!

बॉलिवूडची क्वीन ते नेत्यापर्यंतचा प्रवास केलेली कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.
अभिनयासह, दिग्दर्शन आणि राजकीय क्षेत्रातही कंगना तितकीच सक्रिय आहे. कंगना कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर कंगना बहुतांश वेळा पारंपरिक साड्यांमध्ये दिसते. तिच्या या सोज्वळ लूकचं नेहमीच कौतुक होतं. मात्र यावेळी तिच्या साडीपेक्षा तिची बॅग अधिक चर्चेत आहे.
कंगनाच्या हाती दिसलेली हर्मेस हर्बॅग ३१ ही लक्झरी बॅग आहे. या बॅगची किंमत सुमारे ३.२५ लाख आहे. काही मर्यादित आवृत्तीच्या मॉडेल्समध्ये ही किंमत ४-५ लाखांपर्यंत पोहोचते.
कंगनाची इतकी महागडी बॅग पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. इतक्या महागड्या बॅगा खरेदी केल्याबद्दल कंगनाला अनेक वेळा ट्रोलही करण्यात आले आहे.
कंगना शेवटची ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकली होती, जो तिने स्वतः दिग्दर्शितही केला. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती.
कंगनाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर तिची हॉलिवूडच्या एका चित्रपटात वर्णी लागल्याची माहिती समोर आली आहे.
कंगना राणौत ही 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या हॉरर ड्रामामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. कंगना या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.