पूनम पांडेच्या या गोष्टीवर फिदा झाली कंगना रणौत, म्हणाली - 'स्कूल सुरू कर आणि आम्हाला शिकव'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:21 PM2022-03-21T15:21:33+5:302022-03-21T16:07:25+5:30

Poonam Pandey-Kangana Ranaut : आता पूनम पांडेच्या गेम प्लानिंगचं कंगनाने खूप कौतुक केलं आहे. कंगनाला तिची पूनमची एक कला इतकी आवडली की, तिने पूनमला तिचा क्लास घेण्याचा सल्ला दिला.

कंगना रणौत (Kangana Ranaut)चा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील शो 'लॉक अप' सध्या चांगलाच चर्चेत आहे. यातील वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी नेहमीच समोर येत असतात. यात पूनम पांडेही (Poonam Pandey) चर्चेत असते. (All Photo Credit : Social Media)

आता पूनम पांडेच्या गेम प्लानिंगचं कंगनाने खूप कौतुक केलं आहे. कंगनाला तिची पूनमची एक कला इतकी आवडली की, तिने पूनमला तिचा क्लास घेण्याचा सल्ला दिला.

'लॉक अप' हा शो सुरू होऊन १९ दिवस झाले आहेत. शोमध्ये भांडणं, प्रेम सगळा ड्रामा दाखवला जातो. शोमध्ये पूनम पांडेही कैदी म्हणून कंगनाच्या जेलमध्ये कैद आहे. पूनम फार चांगला गेम खेळत आहे. या आठवड्यात कंगनाने पूनमचं खूप कौतुक केलं.

काही दिवसांपूर्वी लॉक अपमध्ये एक टास्क झाला होता. ज्यात पूनम पांडे आपल्या हॉटनेसने लोकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली. कंगना तिला म्हणाली की, 'तुझा जो अॅक्ट होता, जो रोल तू प्ले केला तो फारच हॉट होता'.

कंगना म्हणाली की, पूनम पांडेच्या या मताशी सहमत आहे की, सिडक्शन एक आर्ट आहे. जे जुन्या काळात महिलांना शिकवलं जात होतं. कंगना रणौतने कौतुक केल्यावर पूनम ब्लड करताना दिसली.

कंगना पूनमला म्हणाली की, 'तू एक स्कूल सुरू करायला पाहिजे. ज्यात कुणालाही सिडक्शनची कला शिकता येईल. अभिनेत्री म्हणाली की, तू स्कूल सुरू करायला पाहिजे. ज्यात लोक प्रवेश घेतील. मलाही ट्रेनिंग दे'.

लॉक अप शोमध्ये गेल्याा आठवड्यात स्पर्धकांना एक चॅलेंज देण्यात आलं होतं. ज्यात पूनम पांडेने सिडक्टिव प्रिन्सेसचा रोल प्ले केला होता.

पूनम पांडेसोबतच करणवीर बोहरा, मुनव्वर फारूकी, शिवम शर्मा, सारा खान आणि अली मर्चेंट यांनी टास्कमध्ये महत्वाची भूमिका साकारली होती.