Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:37 IST2024-11-30T11:10:46+5:302024-11-30T11:37:59+5:30
Kalki Koechlin : पहिल्या चित्रपटानंतर जवळपास दोन वर्षे कोणतंही काम मिळालं नाही.

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीनने अनुराग कश्यपच्या 'देव डी' चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चाहत्यांनी भरभरून दाद दिली.
आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करून आणि प्रसिद्ध होऊनही, कल्कीला तिच्या पहिल्या चित्रपटानंतर जवळपास दोन वर्षे कोणतंही काम मिळालं नाही.
आता तिच्या नवीन मुलाखतीत कल्कीने तिच्या प्रोफेशनल लाईफमधील कठीण टप्प्याबद्दल सांगितलं. तिने पैशासाठी अनेक प्रकारच्या भूमिका केल्याचा खुलासाही अभिनेत्रीने केला.
कल्की म्हणाली, 'देव डी' नंतर मला दोन वर्ष दुसरा कोणताच चित्रपट मिळाला नाही. मला वाटतं यानंतरचा माझा पुढचा चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' होता.
या काळात कल्कीला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला. पैशाअभावी वडापाव खाऊनच दिवस काढल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ती लोकल ट्रेनने प्रवास करायची.
यशाबद्दल लोकांच्या समजुतीबद्दल बोलताना कल्की म्हणाली की, लोकल ट्रेनमध्ये तिला पाहून लोक खूप आश्चर्यचकित व्हायचे. लोक तिला विचारायचे की तिच्याकडे बॉडीगार्ड का नाही?
कल्कीनेही आपण पैशासाठी वेगळ्या भूमिका केल्याचं मान्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली- मी पैशासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत.
कल्की 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसली होती. ती सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिचे अनेक चाहते आहेत.