'कल हो ना हो'मधील प्रिती झिंटाचा छोटा भाऊ आठवतोय? २१ वर्षानंतर अभिनय सोडून करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:30 IST2024-12-07T13:15:56+5:302024-12-07T13:30:45+5:30

कल हो ना हो मध्ये प्रिती झिंटाचा क्यूट भाऊ आता काय करतो? अभिनय क्षेत्र सोडून कोणत्या फिल्डमध्ये आहे? घ्या जाणून (kal ho na ho)

'कल हो ना हो' सिनेमा सर्वांच्या हृदयाच्या जवळ आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी पुन्हा रिलीज झाला आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला गर्दी केली

'कल हो ना हो' सिनेमातील शाहरुख खान, प्रिती झिंटासोबत असलेल्या बालकलाकारांनीही चांगलंच प्रेम मिळालं. सिनेमात प्रिती झिंटाच्या छोट्या भावाची भूमिका साकारली अथिक नाईकने

अथिक नाईकच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. आता २१ वर्षांनंतर अथिक नाईक चांगलाच बदलला आहे. याशिवाय त्याने अभिनय क्षेत्रालाही रामराम ठोकलाय

अथिकने बालपणी विविध बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. यात कल हो ना हो सोबतच 'आबरा का डाबरा', 'मुझसे दोस्ती करोगे', 'जानशीं' अशा सिनेमांचा समावेश आहे

बालकलाकार म्हणून ओळख मिळत असतानाच ११ व्या वर्षी अथिकने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. अथिक पुढे अमेरिकेत शिक्षणासाठी गेला

अथिक अभिनय जरी करत नसला तरी त्याने सिनेमेटोग्राफीची फिल्ड निवडली. ११ वर्ष त्याने लॉस एंजेलिसमध्ये सिनेमेटोग्राफीचं शिक्षण घेऊन काम केलं

काही वर्षांपूर्वी अथिक भारतात परतला असून त्याने काही ओटीटी शोसाठी सिनेमेटोग्राफी केलीय. याशिवाय काही महिन्यांपूर्वी त्याचं लग्नही झालं