आतून असे दिसते अजय देवगण व काजोलचे घर, पाहा इनसाईड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:45 PM2020-07-05T15:45:00+5:302020-07-05T15:45:02+5:30

अजय काजोलचे सुंदर घर

अजय देवगण म्हणायला शांत व काहीसा लाजºया स्वभावाचा अभिनेता. पण त्याची लाइफस्टाईल प्रचंड लक्झरिअस आहे. अजय पत्नी काजोज व मुलांसोबत जुहू भागात राहतो.

अजय व काजोलच्या बंगल्याचे नाव आहे, शिवशक्ती. या बंगल्याच्या आतील काही इनसाईड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घराच्या बाल्कनीतून मुंबई न्याहाळणारी ही काजोल आणि बाजूलाच अजय देवगण या फोटोत दिसत आहेत.

काजोलने तिच्या घराचा कोपरा न् कोपरा अतिशय सुंदर पद्धतीने सजवला आहे.

या घरात सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे. स्विमींग पूलपासून जिम, मिनी थिएटर, लायब्ररी, स्पोर्ट रूम, मोठे गार्डन असे सगळे काही याठिकाणी आहे.

काजोल व अजयचे घर व्हाईट अ‍ॅण्ड ब्राऊन कलरच्या फर्निचरनी सजवले आहे. लाईट कलरच्या पडद्यांनी घराला एक लॅविश लूक मिळतो.

केवळ मुंबईतच नाही तर जगातील सर्वात महागडे शहर लंडनमध्येही त्यांचे एक प्रायव्हेट व्हिला आहे.

लंडनच्या पार्क लेन भागातील या अलिशान व्हिलाची किंमत सुमारे 54 कोटी रूपये आहे. अजय व काजोल मुलांसोबत अनेकदा याठिकाणी सुट्टीची मजा घेतात.

काजोल अनेकदा आई तनुजासोबत घरात क्वालिटी टाईम घालवते.

अजय देवगणकडे स्वत:चे प्रायव्हेट जेटही आहे. 2010 मध्ये त्याने ते खरेदी केले होते.