जुही चावलाची लेक आहे Bold & Beautiful; लाइमलाइटपासून राहते दूर, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:57 IST2024-01-19T17:21:03+5:302024-01-19T17:57:38+5:30
अगदी आईची सावली आहे जान्हवी मेहता.

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने ९० चा काळ प्रचंड गाजवला. तिच्या सौंदर्यावर आजही चाहते घायाळ आहेत. सध्या अभिनेत्री जुही चावला चर्चेत आहे. यामागे कारण ठरली आहे. तिची मुलगी जान्हवी.
बॉलिवूडमधील करिअर शिखरावर असताना जुहीने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
जुहीच्या मुलीचं नाव जान्हवी तर मुलाचे नाव अर्जुन आहे.
जान्हवी मेहता बॉलिवूडच्या चकाकीपासून दूर राहणे पसंत करते. आईपेक्षा वेगळं करिअर तिनं निवडलं आहे.
जान्हवीला अभिनेत्री व्हायचं नाही. तिला लाइमलाइटपासून दूर राहायला आवडतं. तिचा शैक्षणिक रेकॉर्डही खूप चांगला आहे.
जान्हवी कोलंबिया विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
जान्हवी मेहताला अभिनयात नाही तर तिला क्रिकेटमध्येही रस आहे. जान्हवीला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड आहे.
जान्हवी मेहता अनेकदा आयपीएलच्या लिलावात दिसली आहे. जान्हवीलाही वाचनाची खूप आवड आहे.
जान्हवी तिच्या आईसारखी सुंदर आहे. ती हुबेहूब जुहीसारखी दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटलं.
जान्हवीच्या स्माईलचेही कौतुक चाहत्यांनी केलं. तिचं हास्य अगदी आई जुहीसारखेच आहे.
जान्हवी इतर स्टार किड्सप्रमाणे सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही, पण ती कधी-कधी काही फोटो शेअर करत असते.