80s चा काळ गाजवणाऱ्या जया प्रदामध्ये झालाय कमालीचा बदल; आताचा लूक पाहून ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:00 AM2022-08-05T07:00:00+5:302022-08-05T07:00:00+5:30

Jaya prada: जया प्रदा या आजही पूर्वी इतक्याच ग्लॅमरस दिसतात. वेस्टर्न वा पारंपरिक दोन्ही आऊटफिटमध्ये त्या छान दिसतात.

80s आणि 90s चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जया प्रदा. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर जया प्रदा यांनी लोकप्रियता मिळवली.

'सरगम', 'माँ', 'घर घर की कहानी', 'तूफान', 'स्वर्ग से सुंदर', 'संजोग', 'मुद्दत', 'सिंदूर', 'जबरदस्त', 'जख्मी', 'गंगा तेरे देश में', 'कामचोर', 'आवाज', 'पाताल भैरवी', 'सपनों का मंदिर' असे कितीतरी हिट चित्रपट तिने दिले.

उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या जया प्रदा यांचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

जया प्रदा अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांच्या वैयक्तिक जीवनाचे अपडेट शेअर करत असतात.

सध्या सोशल मीडियावर जया प्रदा यांचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहिल्यावर त्यांच्यात झालेला बदल लक्षात येतो.

जया प्रदा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या त्यांच्याशी निगडीत अपडेट शेअर करत असतात.

जया प्रदा यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमधून करिअरची सुरुवात केली.

जया प्रदा या आजही पूर्वी इतक्याच ग्लॅमरस दिसतात. वेस्टर्न वा पारंपरिक दोन्ही आऊटफिटमध्ये त्या छान दिसतात.