अमिताभ नव्हे 'हा' आहे जया बच्चन यांचा आवडता अभिनेता, म्हणाल्या - "त्याच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:45 IST2025-04-15T10:55:27+5:302025-04-15T11:45:03+5:30
अमिताभ बच्चन नव्हे तर जया बच्चन यांचा फेव्हरेट अभिनेता वेगळाच आहे. त्याविषयी स्वतः बिग बींनी खुलासा केलाय (jaya bachchan)

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. जया बच्चन सध्या अनेकदा पापाराझींवर ज्या प्रकारे ओरडतात त्यामुळे चर्चेत असतात
जया बच्चन यांचं रिअल लाईफमध्ये बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झालंय.पण जया बच्चन यांचा आवडता अभिनेता वेगळाच आहे, याविषयी त्यांनी खुलासा केलाय.
धर्मेंद्र हे जया बच्चन यांचा आवडता अभिनेते आहेत. धर्मेंद्र यांच्यापेक्षा सुंदर व्यक्ती दुसरा कोणीही नाही, असं जया बच्चन यांचं स्पष्ट मत आहे. असा खुलासा स्वतः बिग बींनी एका केबीसीमध्ये केला.
याशिवाय हरी भाई अर्थात संजीव कुमार सु्द्धा जया बच्चन यांचे आवडते कलाकार आहेत. जया आणि संजीव यांनी अनेक सिनेमे केले आहेत. 'अनामिका', 'कोशीश' यांसारख्या सिनेमांमध्ये जया बच्चन आणि संजीव कुमार यांची जोडी जमली.
जया बच्चन यांनी १९७१ साली धर्मेंद्र यांच्यासोबत 'गुड्डी' सिनेमात अभिनय केला. जया बच्चन यांच्या करिअरमधील हा पहिला सुपरहिट सिनेमा समजला जातो.
याशिवाय २०२३ ला जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात अभिनय केला. हा सिनेमाही चांगलाच गाजला
जया बच्चन सध्या कोणत्याही आगामी सिनेमात काम करत नाहीत. त्या सध्या राजकारणात सक्रीय असून संसदेत त्या विविध प्रश्नांवर आवाज उठवताना दिसतात