फुल ऑन... 'बवाल'!!! जान्हवी कपूरचं वरूणसोबत रोमँटिक फोटोशूट, साऱ्यांच्याच खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 07:07 PM2023-07-20T19:07:09+5:302023-07-20T19:30:12+5:30

फोटोशूट दरम्यान वरूणने जान्हवीचा कान चावल्याने रंगल्या वेगळ्याच चर्चा

Janhvi Kapoor Varun Dhawan Intimate Photoshoot: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर त्यांच्या आगामी 'बवाल' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सध्या जान्हवी आणि वरुण 'बवाल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

यादरम्यान जान्हवी आणि वरूण दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात त्यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसून येत आहे.

'बवाल' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वरुण धवन आणि जान्हवी कपूरने हे फोटोशूट केले आहे. 'हॉट & फिट' कपलच्या या सेन्शुअल फोटोशूटने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

याच आऊटफिटमधील जान्हवी आणि वरूण यांचा एक वेगळा फोटो व्हायरल झाला होता. त्यात वरूण जान्हवीच्या कानाचा चावा घेताना दिसला.

या फोटोमुळे वरुण अन् जान्हवी दोघेही ट्रोल झाले. नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. परंतु, या दोघांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता चित्रपटाच्या प्रमोशनवर लक्ष केंद्रित केले आहे.

सर्व फोटो- वरूण धवन जान्हवी कपूर इन्स्टाग्राम अकाऊंट (Instagram)