Ritesh Deshmukh: 'ती माती गावातच, शहरात काँक्रीट'; रितेशने सांगितला गावच्या मैत्रीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 11:57 AM2022-12-27T11:57:04+5:302022-12-27T12:11:37+5:30

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा सर्वांचा लाडका अभिनेता. 2002 पासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या रितेशने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा सर्वांचा लाडका अभिनेता. 2002 पासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या रितेशने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

लवकरच रितेश दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करतोय. होय, त्याने दिग्दर्शित केलेला आणि त्याची मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ (Ved) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

रिलीजआधीच ‘वेड’ने चाहत्यांना जणू वेड लावलं आहे. चित्रपटाच्या गाण्यांनीही धुमाकूळ घातला आहे. अगदी इंडस्ट्रीतल्या अनेकांना ‘वेड’च्या गाण्यांनी थिरकायला भाग पाडलं आहे. रितेश या चित्रपटाच्या निमित्ताने सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यात तो अनेक गोष्टी सांगताना दिसून येतो.

एका मुलाखतीतमध्ये रितेशला त्याच्या बालपणीच्या मित्राची आणि गावकडच्या आठवणींचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, प्रेमाचं वेड लावणारी माती गावाकडंच असल्याचं रितेशने म्हटलं.

रितेश देशमुखला त्याच्या बालमित्रांची किंवा लहानपणीच्या आठवणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, आम्ही उन्हाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जायचो, बाभुळगावला. तिथं गेल्यावर लहानपणी माझे अनेक मित्र झाले. दोन महिने आम्ही गावकडं असल्याने आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी याचचे.

या काळात आम्ही गावात क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवायचो. अनेकदा शेजारील गावात जाऊन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी व्हायचो. लहानपणीची ती मजा वेगळीच होती. मोठे झाल्यानंतर आता मी अभिनेता झालो, माझे ते मित्र कुणी कारखान्यात कामाला जातो, कुणी शाळेत नोकरीला जातो.

मग, त्यांना भेटल्यावर त्या जुन्या आठवणी निघतात, अरे तो तर हा... मग त्यांच्या डोळ्यात जे प्रेम दिसतं ना ते तेच प्रेम असतं, अशा मैत्रीचा किस्सा रितेशने एका मुलाखतीदरम्यान सांगितला. तसेच, आजही आपल्याला गावाकडं राहायला, जमिनीशी नातं जोडायला आवडतं, असे रितेशने म्हटले.

रुटेड असण्यासाठी मातीशी जी नाळ आपण जोडतो, ती माती गावात आहे, शहरात काँक्रीट आहे, असे म्हणत गाव आणि शहरातील मैत्री, प्रेम, जिव्हाळा रितेशने आपल्या भाषेत व्यक्त केला.

तुम्हाला जर मातीशी जुळायचं असेल तर आपल्या गावी जावं. प्रत्येकजण मुंबईत आला असेल तरी, तो कुठल्या तरी गावातून येतो. त्या आपल्या गावात जाऊन, शेतात राहून, छोट किंवा मोठं घर असेना.

जोपर्यंत आपण ते अनुभवत नाही, तोपर्यंत ते तुमच्या रक्तात येत नाही, असे म्हणत रितेशन वेड चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत गावातील प्रेमाचा जिव्हाळा व्यक्त केला.