किती कोटींचा मालक आहे आमिरचा जावई; जाणून घ्या नुपूर शिखरेचं नेटवर्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:35 IST2024-01-04T16:28:16+5:302024-01-04T16:35:08+5:30
Nupur shikhare: नुपूरनेदेखील अमाप संपत्ती कमावली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने ३ जानेवारी रोजी प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली.
नुपूर आणि आयरा यांचं लग्न सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे.
आमिरने मोठ्या धुमधडाक्यात आपल्या लाडक्या लेकीचं लग्न केलं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने रजिस्टर पद्धतीने लग्नगाठ बांधली.
या लग्नात नुपूर बनियन आणि हाफ पँटवर आल्यामुळे त्याच्या या लूकची नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा झाली.
सध्या सोशल मीडियावर नुपूरविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.
नुपूर कोण आहे, काय करतो, त्याची संपत्ती किती, त्याच्या कुटुंबात कोण कोण आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी चाहते प्रयत्न करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर आमिरच्या लेकीशी लग्न करणाऱ्या नुपूरचं इन्कम किती आणि संपत्ती किती याची चर्चा रंगली आहे.
नुपूर एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. आतापर्यंत त्याने आमिर खानसह सुश्मिता सेन, राणा दग्गुबाती, पुलकित सम्राट यांसारख्या सेलिब्रिटींनी फिटनेसचे धडे दिले आहेत.
आमिरच्या लेकीशी लग्न करणारा नुपूर हा सुद्धा कमाईच्या बाबतीत कमी नाही.
नुपूरची एकूण संपत्ती ८.२ कोटींइतकी असल्याचं सांगण्यात येतं. तर आयराची वडिलोपार्जित संपत्ती ४. ९ कोटींची आहे. त्यामुळे या दोघांची मिळून त्यांची एकूण संपत्ती १२ कोटींपेक्षा जास्त आहे.
नुपूरची आई प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहे.