Heeramandi First Look: संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' वेबसीरिजचा फर्स्ट लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 06:31 PM2023-02-18T18:31:03+5:302023-02-18T18:38:55+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल टाकलं आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल टाकलं आहे.

त्यांची आगामी वेबसीरिज ‘हीरामंडी’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसिरीजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख पहिल्या लूकमध्ये दिसत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

सर्व अभिनेत्रींचा रॉयल अंदाजमधील हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

'गंगूबाई काठियावाडी'नंतर आता संजय लीला भन्साळी 'हिरामंडी'मधून धुमाकूळ घालणार आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

लवकरच नेटफ्लिक्सवर हीरामंडी ही वेब सिरीज रिलीज होणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. x

‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. मात्र ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही.

या वेबसीरिजमधील अभिनेत्रीचे लूक व्हायरल होताना दिसत आहेत.

या सीरिजचा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर प्रेक्षक रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.