माजी मुख्यमंत्र्यांची हॉट नात संस्कृती बॉलिवूडमध्ये! पहिल्याच सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:35 IST2026-05-08T14:23:33+5:302026-05-08T14:35:41+5:30

सध्या कलाविश्वात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

सध्या कलाविश्वात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

'कृष्णावतारम' हा पॅन इंडिया सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात संस्कृती जयना हिने मुख्य भूमिका साकारली आहे. संस्कृती या सिनेमात सत्यभामाच्या भूमिकेत आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. तेव्हापासूनच संस्कृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

संस्कृती ही गुजरातच्या माजी महिला मुख्यमंत्री आणि सध्याच्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नात आहे.

संस्कृती २७ वर्षांची असून तिने 'कृष्णावतारम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

संस्कृती एक बिजनेसवुमनही आहे. १६ वर्षांची असतानाच तिने बिजनेसमध्ये पाऊल ठेवलं होतं. एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ती ओळखली जाते.

संस्कृती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

करिअर आणि पर्सनल लाइफमधील अपडेट्स संस्कृती चाहत्यांना सोशल मीडियावरुन देते. अनेकदा ती तिचे हॉट फोटोही शेअर करत असते.