Struggle Story: उपाशी झोपलो, शिव्याही ऐकल्या; गजराज राव यांनी मानधन कमी करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 01:11 PM2023-07-14T13:11:11+5:302023-07-14T13:38:00+5:30

गजराज राव यांच्या स्ट्रगलचा 'तो' काळ

अभिनेता गजराज राव (Gajraj Rao) सध्याचे मनोरंजनसृष्टीतील प्रभावशाली अभिनेते. त्यांनी आपल्या सहज अभिनयातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 1994 साली आलेल्या 'बँडिट क्वीन' मधून त्यांनी पदार्पण केले. मात्र त्यांना प्रसिद्धी बऱ्याच वर्षांनी मिळाली.

2018 साली आलेल्या 'बधाई दो' सिनेमाने त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. या सिनेमामुळे नीना गुप्ता आणि गजराज यांचं नशीबच पालटलं. पण गजराज राव यांना सहजसोप्या पद्धतीने यश मिळालेलं नाही. म्हणूनच त्यांनी आता मानधनात घच न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गजराज राव यांच्यावर एकवेळ अशी आली होती की ते उपाशी पोटीच झोपायचे. त्यांना सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल करावा लागला होता. आज मात्र त्यांच्याकडे कामाची रांग आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी स्ट्रगलच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

गजराज राव यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले, 'मी सुरुवातीला अनेक ठिकाणी नोकरी केली. मला मार्गदर्शन करणारं कोणीही नव्हतं. एक वेळ अशी आली की माझी आर्थिक स्थिती प्रचंड बिघडली. अशावेळी तुमचं स्वप्नभंग झाल्यासारखं होतं.

गजराज राव यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी २५ ते ३० वर्ष खूप मेहनत घेतली. आता त्यांना महागड्या हॉटेलमध्ये जाणं, बिझनेस क्लासने प्रवास करणं हे सगळं शक्य होत आहे. मला हे सगळं हवं होतं. कुटुंबासाठी हवं होतं. मला कुटुंबाला शक्य ते सगळं काही द्यायचं आहे.

एका कास्टिंग डायरेक्टरने त्यांना सांगितलं की मानधनाच्या मागणीवरुन ते स्वत:साठीच अडचण निर्माण करत आहेत. मात्र त्यांनी कधीच मानधन कमी केलं नाही. ते म्हणाले, 'कास्टिंग डायरेक्टरने मला फीस कमी करण्यास सांगितलं होतं. केवळ २० दिवसांच्या कामासाठी हे मानधन जास्त आहे असं ते म्हणाले. तेव्हा मी म्हणालो मी कुठे २० दिवसांच्या कामाचे पैसे मागतोय. या ठिकाणी पोहोचण्यासाठी मी जी मेहनत घेतलीए त्याचं मानधन मी मागतोय.'

20 दिवस मी उपाशी झोपलो, चहावर राहिलो, शिव्या ऐकल्या. टाऊन ते अंधेरी पायी चाललो, त्याचं मानधन मी आता मागत आहे. नाहीतर आताच्या या २० दिवसांचं काम तर मोफतच आहे, असंही ते म्हणाले.

गजराज राव नुकतेच 'सत्यप्रेम की कथा' सिनेमात दिसले. तर ते आगामी 'मैदान' आणि 'ट्रायल पीरियड' चित्रपटात दिसणार आहेत. त्यांनी अजय देवगणच्या 'भोला'मध्येही काम केलं होतं.