सैफ अली खानच्या एक्स पत्नीबरोबर होतं सनी देओलचं अफेअर, अमृता सिंगच्या आईला कळलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 06:31 PM2023-08-30T18:31:30+5:302023-08-30T18:43:26+5:30

सनी देओलबरोबरचं रिलेशनशिप अमृता सिंगच्या आईला नव्हतं मान्य, अभिनेत्याच्या एका चुकीमुळे तुटलं नातं

बॉलिवू़ड कलाकारांचे अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. कलाकारांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही उत्सुकता असते. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांचं प्रेमकहाणीही प्रचंड गाजली होती. परंतु, सैफशी लग्न करण्याआधी अमृता सिंहचं नाव वेगळ्याच अभिनेत्याबरोबर जोडलं गेलं होतं.

अमृता आणि गदर फेम अभिनेता सनी देओल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. १९८३ साली अमृताने बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सनी देओलबरोबर अमृताने स्क्रीन शेअर केली होती. चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटात सनी देओल आणि अमृताच्या किसींग सीनची बरीच चर्चाही रंगली होती.

बेताब चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी देओल आणि अमृतामध्ये जवळीक वाढली होती. त्यामुळेच ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्या दोघांपैकी कुणीही हे वृत्त नाकारलंही नव्हतं. अमृताचं घराणे प्रतिष्ठित आणि मोठं होतं. तिची आई राजकीय घराण्यातील होती. त्यामुळेच आपल्या मुलीचा विवाहही प्रतिष्ठित घऱातच करण्याची त्यांची इच्छा होती.

सनी देओल आणि अमृताचं रिलेशनशिप तिच्या आईला मान्य नव्हतं. त्यांचा या नात्याला विरोध होता. अमृता लग्न श्रीमंत घरात करुन देण्याची त्यांची इच्छा होती. तरीही त्या सनी देओलबाबत बाहेरुन जाणून घेत होत्या. तेव्हा त्यांना सनी देओल लंडनमधील पूजा या मुलीबरोबरही रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजलं. त्याने पूजाबरोबर लग्न केल्याच्या अफवाही होत्या.

तर दुसरीकडे सनी देओलची आई प्रकाश कौर यांनाही अमृता सून म्हणून पसंत नव्हती. पण, सनी देओलच्या या रिलेशनशिपबाबत कळताच अमृता धक्का बसला होता. त्यानंतर मग त्यांच्या नात्यात दुरावा आला.

१९९१ साली अमृताने सैफ अली खानबरोबर लग्न करत संसार थाटला. सैफशी लग्न करण्यासाठी अमृताने मुस्लीम धर्म स्वीकारला होता. १२ वर्षांनी लहान असलेल्या सैफबरोबर लग्न केल्यामुळे अमृता चर्चेत आली होती. लग्नानंतर १३ वर्षांनी अमृता आणि सैफ घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत.

अमृताबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सैफने २०१२ साली करीना कपूरबरोबर दुसरं लग्न केलं. सैफ आणि करीनाला तैमूर आणि जेह ही मुले आहेत.