रेणुका शहाणे ते नीलम कोठारी पर्यंत, पहिलं लग्न मोडलं, मग या अभिनेत्रींनी थाटला दुसरा संसार, पाहा कोण आहेत त्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:32 PM2023-03-29T14:32:59+5:302023-03-29T14:56:31+5:30

लग्न आयुष्यात एकदाच होतं असं म्हणतात. पण बी-टाऊनमध्ये अशा अनेक तारका आहेत ज्यांचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. या यादीत कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊयात.

९० च्या दशकातील ग्लॅमर क्वीन नीलम कोठारीचे पहिले लग्न २००० मध्ये ऋषी सेठियासोबत झाले होते. पण हे जोडपेही काही काळानंतर वेगळे झाले. त्यानंतर नीलम अभिनेता समीरच्या प्रेमात पडली आणि २०११ मध्ये दोघांनी लग्न केले.

बिंदिया गोस्वामीचे वैयक्तिक आयुष्य रोलर-कोस्टर राईडपेक्षा कमी नव्हते. बिंदियाने पहिले लग्न विनोद मेहरा यांच्याशी केले होते. मात्र काही वर्षांनी ते वेगळे झाले. त्यानंतर अभिनेत्रीने १९८५ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्याशी लग्न केले.

अभिनेत्री शेफाली शाहने १९९७ मध्ये हर्ष छायाशी पहिले लग्न केले. पण २००१ मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यानंतर अभिनेत्रीने निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्यासोबत दुसरे लग्न केले.

या यादीत अभिनेत्री गौतमी कपूरच्या नावाचाही समावेश आहे. जिने पहिले लग्न प्रसिद्ध फोटोग्राफर मधुर श्रॉफशी केले होते. पण लग्नानंतर काही महिन्यातच दोघेही वेगळे झाले. त्यानंतर १४ फेब्रुवारी २००३ रोजी अभिनेत्रीने राम कपूरसोबत सात फेरे घेतले.

नीलिमा अजीमच्या लव्ह लाइफमध्ये खूप चढउतार आले. अभिनेत्रीची एक नव्हे तर दुसरं लग्नंही अयशस्वी ठरली. नीलिमाचे पहिले लग्न पंकज कपूरसोबत झाले होते. पण काही वर्षांतच ते वेगळे झाले. दोघेही शाहिद कपूरचे पालक आहेत. त्यानंतर तिने राजेश खट्टरशी लग्न केले, ज्यांच्यापासून तिला एक मुलगा आहे ज्याचे नाव इशान खट्टर आहे. पण 2001 मध्ये त्यांचे नातेही तुटले.

'हम आपके है कौन' या चित्रपटात आपल्या स्मितहास्याने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री रेणुका शहाणेनेही दोन लग्ने केली आहेत. अभिनेत्रीचे पहिले लग्न मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत झाले होते. पण त्यांचे लग्नही फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. त्यानंतर अभिनेत्रीने २५ मे २००१ रोजी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणासोबत दुसरे लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री किरण सध्या चित्रपटांपेक्षा राजकारणात जास्त सक्रिय आहे. किरणचे पहिले लग्न १९७९ मध्ये मुंबईस्थित उद्योगपती गौतम बेरीसोबत झाले होते. ज्यांच्यासोबत त्यांना एक मुलगा सिकंदर खेर आहे. पण दोघांचे लग्न टिकू शकले नाही आणि १९८५ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर किरणने अनुपम खेर यांच्याशी लग्न केले. कॉलेजमध्ये असताना दोघांची भेट झाली.

प्रसिद्ध अभिनेत्री योगिता बालीने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. योगिता ही किशोरची तिसरी पत्नी होती. मात्र नंतर परस्पर मतभेदांमुळे ते १९७८ मध्ये वेगळे झाले. यानंतर अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तीसोबत लग्न केले.