IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:56 IST2022-03-02T17:45:21+5:302022-03-02T17:56:18+5:30
Bollywood Stars :ग्लॅमर दुनियेतील स्टार्सची लोकप्रियताच इतकी की, ती कॅश करण्यासाठी सगळेच खटाटोप करतात. बँडच्या जाहिरातींपर्यंत ठीक पण हॉटेलातही स्टार्सच्या नावाच्या अनेक डिशेस मिळतात...

दीपिका पादुकोण हिच्या नावावर अमेरिकेतल्या ऑस्टिन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये चक्क डोसा मिळतो. म्हणजे, या डोशाला दीपिकाचं नाव दिलं गेलं आहे. पुण्यातही तिच्या नावाचा पराठा विकला जातो.

किंगखान शाहरूख खानच्या नावाचं पान बनारसमध्ये लोकप्रिय आहे. या दुकानात म्हणे शाहरूखने एकदा पान खाल्लं होतं. तेव्हापासून शाहरूखच्या नावाने याठिकाणी पान विकल्या जातं.

भाईजान अर्थात सलमान खानच्या एका चाहत्याने तर सलमानच्या नावावर चक्क रेस्टॉरंट उघडलं आहे. या रेस्टॉरंटचं नाव भाईजान आहे. खास म्हणजे, या रेस्टॉरंटमधल्या मेन्यू कार्डवर चुलबुल चावल, प्रेम डेजर्ट अशा सलमानच्या भूमिकांच्या नावावरच्या अनेक डिशेस आहेत.

रणबीर कपूरची लोकप्रियताही कमी नाही. चंदीगडच्या एका ढाब्यावर रणबीर कपूर नावाने स्पेशल चिकन डिश मिळते. ‘राजनीती’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर खास या ढाब्यावर गेला होता.

प्रियंका चोप्रा तर ग्लोबल स्टार. वेस्ट हॉलिवूडमध्ये मिलिअन्स ऑफ मिल्कशेक्स नावाच्या स्टोरमध्ये प्रियंकाच्या नावाचं एक मिल्क शेक मिळतं.

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई 2 या चित्रपटात अक्षय कुमारने शोएब नावाची भूमिका साकारली होती. दूर ओमानमध्ये याच नावाचं एक कॉकटेल मिळतं. या हॉटेलमध्ये या चित्रपटाचं बरंच शूटींग झालं होतं. त्याच्या सन्मानार्थ हॉटेलातील कॉकटेलला अक्षयच्या कॅरेक्टरचं नाव दिलं गेलं आहे.

साऊथचे मेगास्टार रजनीकांत यांच्या नावावर एका रेस्टॉरंटमध्ये एक दोन नाही तर चक्क 12 डिशेस मिळतात. होय, चेन्नईच्या न्यू नीला भवन रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डवर त्यांच्या नावाच्या 12 डिशेस तुम्हाला दिसतील.

मल्लिका शेरावत ही सुद्धा मागे नाही. वेस्ट वेस्ट हॉलिवूडमध्ये मिलिअन्स ऑफ मिल्कशेक्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये प्रियंका चोप्राच्या नावाचं मिल्क शेक मिळतं तसंच मल्लिकाच्या नावाचंही मिल्क शेक मिळतं.

अभिनेत्री हुमा कुरेशी हिचं नावही या यादीत आहे. इटलीतील एका रेस्टॉरंटमध्ये हुमा कुरेशी स्पेशल नावाची डिश मिळते. अगदी कमी तेलात बनवलेली ही शाकाहारी डिश खूपच लोकप्रिय आहे.

















