'अगर तक़दीर में मौत लिखी है तो...; चाहत्यांचं मन जिंकलेले धर्मेंद्र यांच्या सिनेमातील 'हे' गाजलेले डायलॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:25 IST2025-11-24T15:57:18+5:302025-11-24T16:25:18+5:30

धर्मेंद्र यांचं निधन झाल्याने त्यांचं कुटुंब आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यानिमित्त धर्मेंद्र यांच्या या गाजलेल्या संवादांची सर्वांना आठवण आलीये

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या सिनेमांनी गेली सहा दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जाणून घ्या धर्मेंद्र यांच्या गाजलेल्या संवादांविषयी

"बसन्ती, इन कुत्तों के सामने मत नाचना।" हा धर्मेंद्र यांचा शोले सिनेमातील संवाद चांगलाच गाजला. सिनेमातील वीरु आणि बसंतीची जोडी आजही सर्वांची फेव्हरेट आहे.

"अगर तक़दीर में मौत लिखी है तो कोई बचा नहीं सकता। अगर ज़िंदगी लिखी है तो कोई माई का लाल मार नहीं सकता।", हा धर्मेंद्र यांचा 'धरम वीर' सिनेंमातील गाजलेला डायलॉग.

"ये दुनिया बहुत बुरी है शान्ती। जो कुछ देती है, बुरा बनने के बाद देती है।", हा धर्मेंद्र यांचा काळजाला भिडणारा डायलॉग. 'फुल और पत्थर' सिनेमातील हा संवाद चांगलाच गाजला.

"उमा जी, शायद आपने ख़ुद को कभी हँसते हुए नहीं देखा। कभी चुपके से आईने के सामने जाकर देखिए और देखिए ये हँसी कितनी ख़ूबसूरत है।", धर्मेंद्र यांच्या 'अनुपमा' सिनेमातील हा गाजलेला संवाद.

"पहले एक हिन्दुस्तानी को समझ जाओ, हिन्दी अपने आप आ जाएगी।", देशभक्ती जागवणारा धर्मेंद्र यांचा हा संवाद 'अपने' सिनेमातील आहे. या सिनेमात सनी, बॉबी देओल यांनीही काम केलं होतं.

धर्मेंद्र यांचं आज जुहू येथील निवासस्थानी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि देओल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.