Photos: जॅकलीन फर्नांडिस ते सनी लिओनी! 2021 मध्ये 'या' अभिनेत्रींनी केलं टॉपलेस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 02:15 PM2021-12-24T14:15:00+5:302021-12-24T14:15:00+5:30

Bollywood actresses: २०२१ हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं. यात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी टॉपलेस फोटोशूट करुन वर्षभर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

२०२१ हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं. या वर्षभरात अनेक कलाकार कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आले. तर काही कलाकार त्यांच्या चित्रपट, वेब सीरिजमुळे. यामध्येच अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी टॉपलेस फोटोशूट करुन वर्षभर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.या अभिनेत्री कोण ते पाहुयात.

इशा गुप्ता - बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे कायमच चर्चेत येत असते. मात्र, यावेळी तिने टॉपलेस फोटोशूट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

इशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बाल्कनीत पाठमोरी उभी होती. यावेळी तिने केवळ जीन्स परिधान केली होती.

जॅकलीन फर्नांडिस - श्रीलंकन मॉडेल अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. २०२१ वर्षात जॅकलीनने केलेलं टॉपलेस फोटोशूट विशेष चर्चेत राहिलं.

जॅकलीनने डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं. या फोटोमध्ये तिने एक पांढरी चादर अंगावर ओढून घेतल्याचं पाहायला मिळालं.

सनी लिओनी - बॉलिवूडमधील हॉट अॅक्ट्रेस म्हणून सनी लिओनीकडे पाहिलं जातं. पॉर्न इंडस्ट्रीला कायमचा रामराम केलेली सनी अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. अलिकडेच सनीने एक टॉपलेस फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने सनीचं हे फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये सनीने एका मोठ्या हॅटच्या मागे स्वत:ला झाकून घेतलं होतं.

टीना दत्ता - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे टीना दत्ता. सोज्वळ आणि संस्कारी भूमिका साकारणाऱ्या टीनानेदेखील पहिल्यांदाच टॉपलेस फोटोशूट केलं.

टीनाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर टॉपलेस फोटोशूटचे ४ फोटो शेअर केले होते. विशेष म्हणजे तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले.