PHOTOS : गायतोंडे को बुलाओ...! ‘दृश्यम २’ फेम इशिता दत्ताचे BOLD फोटो अन् चाहत्यांच्या कमेंट्स...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:13 AM2023-01-16T11:13:18+5:302023-01-16T11:21:01+5:30

Drishyam fame Ishita Dutta : होय, इशिताने हे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांना एकदम दृश्यम आठवला. मग काय... इशिताच्या फोटोंवर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स पाऊस पडला...

अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट तुफान गाजला. यात अजयच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा चर्चेत आली आहे.

होय, इशिता दत्ताने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.

सॅटीनच्या स्टायलिश गाऊनमध्ये तिने बॅकलेस पोझ दिल्या आहेत. इशिताचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते अगदी सैराट झाले आहेत.

होय, इशिताने हे फोटो शेअर केलेत आणि चाहत्यांना एकदम दृश्यम आठवला. मग काय... इशिताच्या फोटोंवर एकापेक्षा एक मजेशीर, भन्नाट कमेंट्स पाऊस पडला.

असली बोल्ड आहेस, म्हणूनच तर सॅम तुझ्या पाठी पडला, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

हेच दृश्य... आणि दृश्यममुळे सॅमची हत्या केली आणि आम्हाला वाटलं की सॅमची चूक आहे..., अशी कमेंट करत एका युजरने इशिताची मजा घेतली आहे.

गायतोंडेला बोलवा, अशी एक कमेंटही कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळते आहे. एकंदर काय, इशिताच्या फोटोंमुळे चाहत्यांना पुन्हा एकदा सॅम, दृश्यम आठवला आहे.

इशिताने २०१२ मध्ये तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. इशिता ही मिस इंडिया व बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे.

‘दृश्यम’, ‘दृश्यम २’ या चित्रपटात इशिताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिता दत्ता सोशल मीडियावर सक्रीय असते.