किंग खानची लेक सुहानाचं शिक्षण किती झालंय, तुम्हाला माहिती आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 03:01 PM2023-11-24T15:01:10+5:302023-11-24T15:07:21+5:30

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान ही जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे.

लवकरच ती जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे.

सुहाना खान सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देते. तिला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

सुहाना खान सोशल मीडियावर सक्रिय असते. याआधीही ती जाहिरातींमध्ये दिसली आहे.

सुहाना खान आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं सहज जिंकते. सुहानाचे फोटो इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय असतात.

सुहाना खानचा स्टायलिश लूकही चाहत्यांना आवडतो, त्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात.

सुहानाने तिचे शालेय शिक्षण हे मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय पूर्ण केले आहे.

इंग्लंडच्या आर्डलींग कॉलेजमधून सुहानाने पुढचे शिक्षण घेतले आहे. तर, न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयाचा कोर्स केला आहे.

अभिनय क्षेत्रासह सुहानाला शेती करण्याची आवड आहे. आलिबागमधील थाल गावातील जमीन तिने शेती करण्यासाठी विकत घेतली आहे.

सुहानाचा वडील शाहरुख खानसोबतचा फोटो. लवकरच दोघे एकत्र एका सिनेमात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.