दिव्या भारतीच्या बहिणीला कधी पाहिलंय का? तिच्या इतकीच दिसते सुंदर; करते 'या' क्षेत्रात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:12 PM2022-02-13T12:12:34+5:302022-02-13T12:17:15+5:30

Divya bharti: दिव्याप्रमाणेच तिची बहीणदेखील तितकीच सुंदर दिसत असून सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती हिचं निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. मात्र, ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

सालस, शांत स्वभावाची असलेल्या दिव्याने कलाविश्वात तिच्या नावाचा एक दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे तिला विसरणं कोणालाही शक्य नाही. विशेष म्हणजे तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचीही सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगायची.

दिव्याप्रमाणेच तिची बहीणदेखील तितकीच सुंदर दिसत असून सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते.

दिव्याच्या बहिणीचं नाव कायनात अरोरा असं असून तिचं आणि दिव्या भारती यांच्यातील नातं फार मोजक्या जणांना माहित आहे.

कायनात दिव्याची चुलत बहिण असल्याचं सांगण्यात येतं.

कायनातदेखील दिव्याप्रमाणे कलाविश्वात सक्रीय असून ती ग्रँड मस्ती या चित्रपटात झळकली आहे.

कायनात तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. परंतु, बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणं तिला फारसं शक्य झाल्याचं दिसून येत नाही.

कायनातने अक्षय कुमारच्या खट्टा-मीठा या चित्रपटात आयला रे आयला हे आयटम साँगदेखील केलं आहे.

बॉलिवूडमध्ये फारसं यश न मिळाल्यामुळे कायनातने तिचा मोर्चा पंजाबी आणि मल्याळम चित्रपटांकडे वळवला.

२०१५ मध्ये ती लैला ओ लैला या मल्याळम चित्रपटात झळकली होती.