पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिशा पाटनीचं नवं फोटोशूट पाहाचं! नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 04:48 PM2024-03-24T16:48:02+5:302024-03-24T16:54:45+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. कायमच तिच्या वेगवेगळ्या लूकमधले फोटो ती पोस्ट करत असते.

दिशा पटानीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती कमाल दिसत आहे.

या फोटोशूटसाठी दिशाने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिशाचं कर्व्ही फिगर हायलाईट होत आहे.

मोकळे केस आणि बोल्ड मेकअप असा लूक तिनं पुर्ण केला आहे. तर एकापेक्षा एक पोज देत तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडला आहे.

नुकतेच दिशा पटानाची 'योद्धा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

दिशा पटानी 'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर केली आहे.

'योद्धा'पूर्वी दिशा पटानी 'बागी 2-3', 'एक व्हिलन रिटर्न्स', 'मलंग', 'राधे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.